आज दिनांक १९ ऑगस्ट २०२४ रोजी रक्षाबंधन (Rakshabandhan) सण आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हा सण मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरा केला जातो. महाराष्ट्राच्या राजकारणातही अनेक भाऊ-बहीण आहेत. हेच भाऊ-बहीण रक्षाबंधन सणाला एकत्र येतात आणि आनंदात हा सण साजरा करतात. त्यामुळे या रक्षाबंधन सणाला खासदार सुप्रिया सुळे या उपमुख्यमंत्री अजित पवार याना राखी बांधणार का कडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधली आहे. (Rakshabandhan) काही दिसांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत भास्कर भगरे यांनी भाजपाच्या उमेदवार भारती पवार यांचा पराभव केला होता.
सुप्रिया सुळे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिकमध्य पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. अजित पवार यांनी बंड करून भाजपाशी हातमिळवणी केलेली आहे. सध्या अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. सुप्रिया सुळे आपल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का? याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला लागली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो.
सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमांतही चर्चा सुरू आहे. म्हणजेच सध्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे दोघेही राक्षबांधन साजरी करणार का? आपल्या मोठ्या भावाला त्या राखी बांधणार का? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष हे लागले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या बहीण-भावांच्या जोडीला फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश ओळखतो. सुप्रिया सुळे दरवर्षी अजित पवार यांना राखी बांधतात. त्यांच्या या रक्षाबंधनाची माध्यमांतही चर्चा होते. परंतु आज रक्षाबंधन निम्मित सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत तर अजित पवार हे मुंबई मध्ये आहेत.
लाडकी बहीण योजनेत घोटाळा, ईडी, सीबीआय चौकशी करा; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
सुप्रिया सुळे काल दिनांक १८ ऑगस्ट रोजी नाशिक दौऱ्यावर आहेत. रात्री उशिरा त्या नाशिकमध्ये पोहोचल्या. नाशिकमध्ये पोहोचताच खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे दोन दिवसांपासून उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. राखी पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला चांदवडमध्ये मेळावा झाला. त्यानंतर खासदार भास्कर भगरे यांचे औक्षण करून सुप्रिया सुळे यांनी त्यांना राखी बांधली.
Rakshabandhan राजकारणातल्या भावा-बहिणींमध्ये दुरावा
महाराष्ट्राच्या राजकारणात जसं काका-पुतण्यांमध्ये दुरावा निर्माण झाल्याचं आपण अनेकदा पाहिलं आहे. तसंच चित्र भाऊ आणि बहिणींमध्येही पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे यांनी काका दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची साथ सोडत राष्ट्रवादीचं घड्याळ हातात बांधलं. त्यानंतर मुंडे कुटुंबात दुरावा निर्माण झाला. साहजिकच याचा परिणाम हा बहीण पंकजा मुंडे आणि भाऊ धनंजय मुंडे यांच्या नात्यावरही झाला. मात्र, रक्षाबंधनानिमित्तानं हे दोघेही भाऊ-बहीण एकत्र येत हा सण साजरा करत असतात. तसंच अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या नात्यातही दुरावा निर्माण झालाय. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड केल्यानंतरच हा दुरावा तयार झाला.