16.8 C
New York

Sadabhau Khot : राजकारणात एकनाथ शिंदे कर्ण; तर, फडणवीस आणि पवार..सदाभाऊंनी दिली ‘ही’ उपमा

Published:

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील कर्ण आणि देवेंद्र फडणवीस हे अर्जून आहेत. तर शरद पवार हे शकुनी मामा आहेत अशी वक्तव्य रयत क्रांतीचे प्रमुख आमि महायुतीचे विधान परिषद आमदार (Sadabhau Khot) सदाभाऊ खोत यांनी केले आहेत. ते मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रचारासाठी सांगलीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी सदाभाऊ खोत यांनी केलेल्या राजकीय टिप्पणीची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे.

मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी मिळवून दिलेले पहिलं आरक्षण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी घालवलं असा थेट आरोप सदाभाऊ खोत यांनी केला आहे. एकनाथ शिंदे नावाच्या वाघाने बंड केले आणि देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने मविआचे सरकार पाडून महायुतीचे पुन्हा सरकार आणलं. राज्य कसे चालवावे याचा दुरदृष्टीपणा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस यांना सर्वांनी घेरलं आहे. कारण फडणवीसच आपल्याला फाइट देऊ शकतात हे शरद पवारांना कळलं आहे असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

त्यांच्याकडे फक्त याचं योजनाचं, फडणवीसांचा ठाकरे- पवारांना टोला

Sadabhau Khot प्रस्थापितांना धक्का

मराठा समाजाचे आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. पण यापैकी कोणत्याही मुख्यमंत्र्याने मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही. मात्र, 2019 साली मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस यांनी पहिलं आरक्षण मिळवून दिलं. पण शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला मिळालेले हे आरक्षण घालवलं. मात्र, या दोघांवर टीका झाली नाही , टीका झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्यावर. कारण प्रस्थापितांना धक्का देण्याचं काम फडणवीस यांनी केलं होतं. त्यामुळे शरद पवार महाराष्ट्रच्या राजकारणाततील शकुनीमामा आहेत अशी टीका खोत यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img