28.9 C
New York

Rakshabandhan : न्यू युनिव्हर्सल महाविद्यालयात अनोख्या पद्धतीत रक्षाबंधन साजरा

Published:

जव्हार: पवित्र श्रावण मासातील पौर्णिमेला भारतभर ऑगस्ट महिन्यात राखी पौर्णिमा म्हणजेच रक्षाबंधन (Rakshabandhan) सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील जन उत्कर्ष प्रबोधनी उधवा संचलित न्यू युनिव्हर्सल फाउंडेशन कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाने सोमवारी चालतवड येथे महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षक एकत्र येत रक्षाबंधन हा सण साजरा केला.

रक्षाबंधन हा कार्यक्रम महाविद्यालयात आयोजित करून प्रत्येक इयत्तेनुसार वर्गातील विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधल्या. तद्नंतर या महाविद्यालयाचे प्राध्यापक विकास भोये यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत रक्षाबंधन सण हा भारतात नव्हे तर तो नेपाळ, मॉरिशस व अन्य अनेक देशांमध्ये विशेषत हिंदू लोकांद्धारे साजरा केला जातो.या दिवशी सर्व वयोगटातील बहीण त्यांच्या भावाच्या मनगटाभोवती राखी म्हणजे पवित्र आणि आकर्षक धागा बांधतात .आणि ही राखी बांधून त्यांच्या भावाकडून त्यांचे रक्षण करण्याचे प्रतीक मानले जाते असे सांगितले.

सोने-चांदीचा वापर; काशीच्या राख्यांना परदेशातून मागणी, काय आहे वैशिष्ट्य?

त्यानंतर शिक्षक सुनिल जाबर यांनी उपस्थित विद्यार्थांना रक्षाबंधनाची सुरुवात कशी झाली या विषयी माहिती दिली हे महत्त्व विशद करताना रक्षाबंधनाची सुरुवात लाखो वर्षांपूर्वी देव आणि दानवांमधील युध्दाच्या वेळी करण्यात आली होती, त्यावेळी श्रावण पौर्णिमेच्या दिवशी देवराज इंद्राची पत्नी राणी हिने आपला पती इंद्राच्या हातावर वैदिक मंत्रांनी प्रेरित असलेले रक्षासूत्र बांधले होते ,या रक्षासूत्राच्या बळावर इंद्राने शत्रूंवर विजय मिळवला होता .बदलत्या काळानुसार हेच रक्षासूत्र बहिणींनी आपल्या भावांना बांधायला सुरुवात केली.पूर्वी महिलांच्या सौभाग्याचे प्रतिक असलेली ही राखी आता भाऊ बहिणीच्या प्रेमाच्या पवित्र बंधनात बदलली आहे.असे सांगितले

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img