19.3 C
New York

Doctor Rape Case : कोलकाता डॉक्टर बलात्कार प्रकरणाचा पोस्टमार्टम रिपोर्ट; धक्कादायक गोष्टी उघड

Published:

कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयातील सेमिनार हॉलमध्ये ९ ऑगस्ट रोजी (Doctor Rape Case) घडलेल्या घडनेने देश हादरवून टाकला. महिला कनिष्ठ डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या कोलकता (Kolkata Doctor) येथे केल्याच्या प्रकरणाचे देशभरात तीव्र पडसाद उमटत आहेत. आता या प्रकरणात पीडितेच्या पोस्टमार्टमचा रिपोर्ट समोर आला आहे. या अहवालात पीडितेसोबत करण्यात आलेल्या अत्याचारांबद्दल धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मृत पीडितेच्या शरिरावर १४ हून जास्त जखमा या अहवालानुसार आढळल्या आहेत. तसंच कोणतंही फ्रॅक्चर आढळलं नाही. डोकं, दोन्ही गाल, ओठ, नाक, जबड, अनुवटी, मान, डावा हाथ, खांदे, घुडघे, घोटा आणि प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्या आहेत.

यासोबत शरीरातील अनेक भागांमध्ये रक्ताच्या गुठळ्यांसह फुफ्फुसात रक्तस्त्राव झाल्याचं शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आलं आहे. व्हिसेरा, रक्त आणि इतर गोळा केलेले नमुने विश्लेषणासाठी लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. पीडितेच्या शरीर आणि प्रायव्हेट पार्टवर झालेल्या सर्व जखमा या मृत्यू होण्याच्या आधीच्या असल्याचं पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. मेडिकल ऑफिसरनी या रिपोर्टच्या आधारावर सांगितलं की, दोन्ही हातांना गळा दाबल्याने पीडितेचा मृत्यू झाला होता. यासोबत तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फोर्सफुली पेनिट्रेशनचे वैद्यकीय पुरावे सापडले आहेत. तसंच रिपोर्टमध्ये पीडित महिला डॉक्टरचा लैंगिक आत्याचार झाल्याची शक्यतांबद्दल देखील माहिती देण्यात आली आहे.

म चुकला तर….; नेम चांगलायच्या चर्चांमध्ये ठाकरेंचं स्पष्टीकरण

Doctor Rape Case काय निर्णय येणार?

या भीषण घटनेची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. यासंदर्भात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड, न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचे खंडपीठ मंगळवारी सुनावणी घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीकडे सर्व देशाचं लक्ष लागलं असून न्यायलय काय निर्णय घेते हे पाहाणं महत्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img