9.6 C
New York

Sharad Pawar : मोदींच्या बोलण्याला फार महत्व देण्याची गरज नाही; असं का म्हणाले शरद पवार?

Published:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर शरद पवार यांनी जोरदार टीका केली आहे. राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लागू होते का मला माहित नाही, हा निवडणूक आयोगाला हा प्रश्न असल्याचंही (Sharad Pawar) पवार यावेळी म्हणाले आहेत. राज्यातील विधानसभा निवडणूक लांबणीवर पडल्या आहेत. त्यावर सध्या राज्यात चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनीही वरील भाष्य केलं आहे.

Sharad Pawar महत्त्व द्यायचं नाही

नुताच देशभरात 15 ऑगस्ट साजरा झाला. या दिवशी पंतप्रधानांनी लाल किल्ल्यांवरून बोलताना वन नेशन वन इलेक्शनची संकल्पना मांडली. सगळ्या निवडणुका एकाच वेळी व्हायला हव्यात याचा अर्थ असा त्यांचा आग्रह होता. मात्र, दुसऱ्या दिवशी तीन राज्यांच्या निवडणुकांसाठी वेगवेगळ्या तारखा जाहीर करण्यात आल्या अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. ते म्हणाले की याचा अर्थ असाच आहे की त्यांना फारच महत्त्व द्यायचं कारण नाही. पंतप्रधान बोलतात एक आणि यंत्रणा दुसराच निर्णय घेते याची प्रचिती आल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले.

एकनाथ शिंदेंच्या ‘या’ खळबळजनक दाव्यावर, राऊतांचे सडेतोड प्रतिउत्तर

लडकी बहीण योजनेवरही शरद पवार यांनी भाष्य केलं आहे. लाडक्या बहिणीचा विषया फक्त आपल्या राज्यातील आहे इतर चार राज्यांमधील हा विषय नसल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारकडून छोट्या योजना राबवल्या जात आहेत. त्यासाठी तरतूद नसल्याकडं शरद पवार यांनी लक्ष वेधलं. मुख्यमंत्री आणि त्यांचे सहकारी यासंबंधी भूमिका मांडतील असंही ते यावेळी म्हणाले.

Sharad Pawar त्यांचा अधिकार

नवाब मलिक यांनी राजकीय भूमिका स्पष्ट केल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांनी सोशल मीडियावर घड्याळ चिन्हाचा वापर सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर विचारण्यात आलं असता ते म्हणाले की बघूया आता पुढे काय होतं. दरम्यान, शरद पवार यांनी बारामतीमधून अजित पवारांच्या निवडणूक न लढवण्याच्या भूमिकेवर बोलताना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की त्यांना आपला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यांना अनुकूल वातावरण असेल तिथून ते लढतील. त्यांच्या मनात नक्की काय आहे हे मला माहीत नसल्याचंही पवार या यावेळी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img