19.7 C
New York

Sunita Kejriwal : केजरीवाल यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चेला उधाण

Published:

मध्यधोरणा प्रकरणी सध्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री व आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांनी पुण्यात मार्केटयार्ड परिसरातील कार्यालयात ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी (Sunita Kejriwal ) सुनीता केजरीवाल यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. सुनीता केजरीवाल शरद पवारांच्या भेटीसाठी पुण्यातील मोदी बागेत आल्या होत्या. यावेळी त्यांच्यासोबत आपचे खासदार संजय सिंह हेही उपस्थित होते.

Sunita Kejriwal चर्चेचा विषय गुलदस्त्यात

महाराष्ट्रात येत्या 3 महिन्यांत विधानसभा निवडणूका होणार आहेत. सध्या हरियाणा आणि जम्मू काश्मिरच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. मात्र, महाराष्ट्र आणि दिल्लीच्या निवडणुकी लांबणीवर टाकल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर ही महत्वाची घडामोड मानली जात आहे. शरद पवार आणि सुनीता केजरीवाल यांच्यामध्ये तब्बल अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. दरम्यान, दोघांमध्यो कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

सुप्रिया सुळे अजित पवारांना राखी बांधणार का? राजकीय वर्तुळात चर्चा

Sunita Kejriwal स्वबळावर लढणार?

आम आदमी पार्टीच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा मेनन यांनी काही दिवसांपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना मोठं वक्तव्य केलं होतं. लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडी झाली. मात्र, ती विधानसभा निवडणुकीसाठी नव्हती. विधानसभा निवडणुका हा वेगळा विषय आहे. आम्ही महाराष्ट्र विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असून मुंबईतील 36 जागांवर उमेदवार उभे करणार असल्याचं प्रीती शर्मा यांनी सांगितं होतं. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.

दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी त्यांच्यावर आरोप असून या प्रकरणी त्यांना ईडीने सीबीआयने अटक केली आहे. त्यांनी जामीनासाठी न्यायायल्यात अर्ज केला आहे. मात्र, अद्याप त्यांना दिलासा मिळालेला नाही. दरम्यान मनीष सीसोदिया यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. त्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आली आहे. सर्वांचे लक्ष अरविंद केजरिवाल यांना कधी दिलासा मिळणार या कडे लागून आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img