23.1 C
New York

Sanjay Raut : एकनाथ शिंदेंच्या ‘या’ खळबळजनक दाव्यावर, राऊतांचे सडेतोड प्रतिउत्तर

Published:

“बाळासाहेब ठाकरेंची राज ठाकरेंनी शिवसेना सोडावी ही इच्छा नव्हती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना पक्षातून बाजूला केलं”, असा खळबळजनक दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत एकनाथ शिंदे यांनी हे वक्तव्य केले. राजकीय वर्तुळात एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर खळबळ उडाली आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एकनाथ शिंदे हे खोटं बोलत आहेत. त्यांना 25 वर्षांपूर्वी मातोश्रीचे दरवाजेच उघडे नव्हते”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदे हे ज्यांच्या नादाला लागले आहेत ते सगळे खोटारडे, ढोंगी लोक आहेत. हे आता त्यांच्या कळपात शिरले आहेत. लांडगे आणि कोल्ह्यांच्या कळपात शिरल्यावर दुसरं काय होणार? एकनाथ शिंदे खोटच बोलत आहेत. एकनाथ शिंदे राज ठाकरेंनी पक्ष सोडला तेव्हा आमच्या सोबतच होते. तेव्हा ठाण्याच्या पुढे त्यांची काही मजल नव्हती. 25 वर्षा आधीच्या राजकरण्यात त्यांचा काही सहभाग नव्हता.

नेम चुकला तर….; नेम चांगलायच्या चर्चांमध्ये ठाकरेंचं स्पष्टीकरण

Sanjay Raut …तर ही सत्ताधाऱ्यांची सोय

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. निवडणुका डिसेंबर महिन्यात होऊ शकतात, असे बोलले जात आहे. संजय राऊत याबाबत विचारले असता म्हणाले की, संजय राऊत म्हणाले की, निवडणूक आयोग ही संविधानिक संस्था आहे. पण ती राजकारण्यांच्या हातचं हत्यार आणि बाहुलं बनणार असेल तर देशातील संविधान धोक्यात आहे. न्यायालय, निवडणूक आयोग या संस्था जर मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री यांच्या दबावाखाली काम करणार असतील तर संविधान कुठे राहिले? या देशात महाराष्ट्रातल्या निवडणुका जर डिसेंबर महिन्यात होणार असतील तर ही सत्ताधाऱ्यांची सोय आहे. ज्यांना महाराष्ट्रात पराभवाची भीती वाटते त्यांनी हा डाव टाकला आहे. हरियाणासोबत झारखंड आणि महाराष्ट्र या निवडणुका व्हायला हरकत नव्हती. पण,यासाठी झारखंडची निवडणूक पुढे ढकलली की, त्यांना हेमंत सोरेन यांना हटवायचे आहे. त्यासाठी ते झारखंडची निवडणूक ते घेत नाही आणि महाराष्ट्रातही अशाच राजकीय कारणासाठी निवडणूक घेत नाहीत. महाराष्ट्रात जर निवडणुका घ्यायला निवडणूक आयोग आणि सरकार तयार नसेल याचा अर्थ ही हुकूमशाही सुरू आहे. कुठे आहे राज्यघटना? कुठे आहे संविधान? याचे उत्तर कोणी देणार आहे का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img