4 C
New York

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत बदल, आता ‘या’ महिलांना मिळणार 4500 रुपये

Published:

माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत (Ladki Bahin Yojana) पात्र महिल्यांच्या बँक खात्यात 3-3 हजार रुपये जमा करण्यात येत आहे. राज्य सरकारने आतापर्यंत लाखो महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे हप्ते जमा केले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून सरकारकडून या योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात येत आहे. असाच एक बदल राज्य सरकारकडून करण्यात आला आहे ज्याच्या आता लाखो महिलांना फायदा होणार आहे.

Ladki Bahin Yojana मिळणार 4500 रुपये

ज्या महिलांनी या योजनेत 31 जुलैपूर्वी अर्ज केले आहे त्यांच्या बँक (Bank) खात्यात राज्य सरकारकडून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे जमा करण्यात येत आहे. तर 31 जुलैनंतर अर्ज करणाऱ्या महिलांना सप्टेंबर महिन्यात सप्टेंबरसह जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार आहे. त्या महिलांना सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारकडून 4500 रुपये मिळणार आहे.

सप्टेंबर महिन्यात या योजनेत पात्र असणाऱ्या महिलांना 4500 रुपये मिळणार आहे. राज्य सरकारने 3 जुलै रोजी या योजनेत बदल करण्यात येत असल्याची माहिती दिली होती. या पूर्वी सरकारने या योजनेसाठी काही अटी लागू केले होते. या अटीप्रमाणे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तत पणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणार त्या कुटुंबातील महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आले होते मात्र सरकारने आता ही अट कडून टाकली आहे त्यामुळे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असलेल्या कुटुंबातील महिलांना देखील या योजनेत अर्ज करता येणार आहे. त्यामुळे आता राज्यातील लाखो महिलांना याचा फायदा होणार आहे. तर दुसरीकडे सरकारने या योजनेसाठी अडीच लाख रुपये उत्पन्नाची मर्यादा कायम ठेवली आहे.

दर 16 मिनिटाला एका महिलेवर बलात्कार, NCRB च्या अहवालात काय?

Ladki Bahin Yojana 31 मार्चपर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले : देवेंद्र फडणवीस

लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर टीका करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, ही योजना बंद होणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. ही योजना बंद करण्यासाठी ते कोर्टातही गेले. तुम्ही तुमच्या सावत्र भावांवर विश्वास ठेवू नका. ते कालही काही देत नव्हते आणि आजही काही देत नाही.

आम्ही तुमच्या आर्शीवादाने 31 मार्चपर्यंतचे पैसे बजेटमध्ये ठेवले आहे. आमचे सरकार पुन्हा येणार आणि ही योजना सुरु राहणार. बजेटमध्ये एकाच वर्षाचे पैसे ठेवता येतात, जर पाच वर्षाचे पैसे ठेवता आले असते तर आता ठेवून दिले असते असेही एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img