26.6 C
New York

ICC : यूथ ऑलिंपिकमध्ये क्रिकेट असणार, IOC चे संकेत

Published:

निर्भयसिंह राणे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) 2030 च्या यूथ ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) सोबत सहकार्य करण्याचे संकेत दिले आहेत. आयसीसीच्या या पुढाकाराचा आधार भारत सरकारने गेल्या वर्षी जाहीर केलेल्या घोषणेवर आधारित आहे. 2036 च्या ऑलिम्पिक व्यतिरिक्त मुंबईत 2030 यूथ ऑलिम्पिक गेम्स (YOG) साठी सुद्धा बोली लावली आहे.

आयसीसीचे विकास महाव्यवस्थापक विल्यम ग्लेनराईट यांनी विवेक गोपालन यांना ईमेलमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिला, “ही एक चांगली कल्पना आहे आणि यात आम्ही काही विचार करू शकतो.” गोपालनचा ईमेल आणि ग्लेनराईटचे उत्तर आयसीसीचे सीईओ ज्योफ अलर्डिस, वसीम खान, क्लेअर फर्लाँग आणि ख्रिस टेटली यांनाही कळवण्यात आलं होतं.

गोपनल यांनी असा युक्तिवाद केला आहे की “युवा ऑलिम्पिक गेम्स (YOG) मध्ये क्रिकेटसाठी इनफ्रास्ट्रक्चर मजबूत आहे आणि मुंबईने 2030 YOG चे आयोजन करण्याची बोली लावली आहे.” त्यांनी आयसीसी अधिकाऱ्यांना लिहिले आहे की, “भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुढाकारामुळे  2030 YOG आणि 2036 ऑलिम्पिक दोन्ही आयोजित करण्याची त्यांची इच्छा व्यक्त केली आहे.” मेलमध्ये पुढे नमूद करण्यात आले आहे की, “आता ICC ने IOC सोबत मजबूत संबंध प्रस्थापित केले आहेत आणि IOC ने हे ओळखले आहे की “क्रिकेट ब्रँड” “ऑलिम्पिक ब्रँड” वाढवू शकतो.

1900 च्या पॅरिस गेम्सनंतर प्रथमच 2028 च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. तिरंदाजी, ऍथलेटिक्स, बॅडमिंटन, बास्केटबॉल, बीच व्हॉलीबॉल, बॉक्सिंग, कॅनोइंग, सायकलिंग, डायव्हिंग, अश्वारूढ, तलवारबाजी, फील्ड हॉकी, फुटबॉल, फुटसल, गोल्फ, जिम्नॅस्टिक्स, हँडबॉल, ज्युडो, आधुनिक पेंटाथलॉन, रोइंग, रग्बी सेव्हन्स, सेलिंग, सेलिंग, पोहणे, टेबल टेनिस, तायक्वांदो, टेनिस, ट्रायथलॉन, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग आणि कुस्ती हे खेळ YOG चा भाग आहत.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img