महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री कोण असणार हा प्रश्न जरा जास्तच चर्चिला जात आहे. दोन दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा त्याला माझा पाठिंबा राहिल असे वक्तव्य केले होते. त्यांच्या याच वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. या कोंडी करणाऱ्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शरद पवार गटाचे (Sharad Pawar) नेते सावध प्रतिक्रिया देत आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या मग ठरवू असे वक्तव्य चव्हाण यांनी केले.
मुंबईत काँग्रेसचा भव्य मेळावा; उद्धव ठाकरेंसह ‘हे’ मोठे नेते उपस्थित राहणार
चव्हाण म्हणाले, आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या. किती आमदार निवडून येतात ते आधी पाहू या. त्यानंतर ठरवता येईल की कोण सरकार चालवेल. ज्याचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे ठरले तर मग पाडापाडी होते असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. पण तसे काही होत नाही. मुख्यमंत्री कोण होणार हे काही इथं ठरत नसतं त्याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेत असतात. पण या निमित्तानं एक चांगली गोष्ट झाली ती म्हणजे लोकांमध्ये आणि माध्यमांमध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या. किती आमदार निवडून येतात ते आधी पाहू या. त्यानंतर ठरवता येईल की कोण सरकार चालवेल असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
Uddhav Thackeray काय म्हणाले होते उद्धव ठाकरे ?
गेली अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी कोण होणार अशी ही चर्चा आहे. परंतु, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. यांना माझं सांगण आहे की आपण करा मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर माझा त्याला पाठिंबा असेल असं उद्ध ठाकरे मुंबईतील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात म्हणाले होते.