8.4 C
New York

IND v BAN : भारत विरुद्ध बांग्लादेश यांच्यातील T20I सामना होणार ग्वालियरला

Published:

निर्भयसिंह राणे

भारत आणि बांगलादेश (IND v BAN) यांच्यातील पहिली T20I, जी धर्मशाला येथे होणार होती, ती आता ग्वालियर येथे खेळवली जाणार आहे अशी घोषणा बीसीसीआयने (BCCI) केली आहे. “हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने ड्रेसिंग रूममध्ये सुधारणा आणि नूतनीकरणाचे काम चालू असल्यामुळे स्थळांमध्ये बदल करणे आवश्यक होते,” बोर्डाने एका प्रकाशनात म्हटले आहे.

हा सामना, जो अजूनही 6 ऑक्टोबर रोजी खेळला जाईल, तो नव्याने बांधलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियमवर पहिला आंतरराष्ट्रीय सामना असेल. सचिन तेंडुलकरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात द्विशतक ठोकल्यानंतर ग्वालियरमध्ये हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना असेल.

इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या आणि दुसऱ्या T20 सामन्यांच्या स्थळांमध्येही अदलाबदल झाली आहे. तारखा त्याच असतील (22 आणि 25 जानेवरी), पहिला सामना आता चेन्नईऐवजी कोलकात्यात खेळवला जाईल. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम, जे आधी मालिकेच्या पहिली मॅचसाठी नियोजित होते ते दुसरी T20I आयोजित करतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img