आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मलेशियात होणाऱ्या 19 वर्षांखालील महिला टी 20 विश्वचषकाचे वेळापत्रक T20 World Cup जाहीर केले आहे. या विश्वचषकात 16 संघ सहभागी होणार असून एकूण 41 सामने होणार आहेत. या स्पर्धेची सुरुवात 18 जानेवारीपासून होणार आहे. अंतिम सामना 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. स्पर्धा सुरू होण्याआधी 13 ते 16 जानेवारी दरम्यान 16 सराव सामने खेळवण्यात येणार आहेत. हा दुसरा वर्ल्डकप आहे. पहिला वर्ल्डकप भारतानेच जिंकला आहे. या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना 19 जानेवारी रोजी वेस्टइंडिज विरुद्ध होणार आहे.
T20 World Cup कोणत्या गटात कोणता संघ?
या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान एका गटात नाहीत. ग्रुप ए मध्ये भारत, वेस्टइंडिज, श्रीलंका आणि मलेशिया आहेत. ग्रुप बी मध्ये इंग्लंड, पाकिस्तान, आयर्लंड आणि युएसए आहेत. ग्रुप सी मध्ये न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, आफ्रिकेचे क्वालिफायर आणि समोआ यांचा समावेश आहे. ग्रुप डी मध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, आशियातील क्वालिफायर संघ आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे.
T20 World Cup असे आहे वेळपत्रक
18 जानेवारी : आस्ट्रेलिया वि. स्कॉटलंड
18 जानेवारी : इंग्लंड वि. आयर्लंड
18 जानेवारी : समोआ वि. आफ्रिका क्वालिफायर
18 जानेवारी : बांग्लादेश वि. आशिया क्वालिफार
18 जानेवारी : पाकिस्तान वि. युएसए
18 जानेवारी : न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका
19 जानेवारी : श्रीलंका वि. मलेशिया
19 जानेवारी : भारत वि. वेस्टइंडिज
20 जानेवारी : ऑस्ट्रेलिया वि. बांग्लादेश
20 जानेवारी : आयर्लंड वि. युएसए
20 जानेवारी : न्यूझीलंड वि. आफ्रिका क्वालिफायर
20 जानेवारी : स्कॉटलंड वि. आशिया क्वालिफायर
20 जानेवारी : इंग्लंड वि. पाकिस्तान
20 जानेवारी : दक्षिण आफ्रिका वि. समोआ
21 जानेवारी : वेस्टइंडिज वि. श्रीलंका
21 जानेवारी : भारत वि. मलेशिया
22 जानेवारी : बांग्लादेश वि. स्कॉटलंड
22 जानेवारी : इंग्लंड वि. युएसए
22 जानेवारी : न्यूझीलंड वि. समोआ
22 जानेवारी : ऑस्ट्रेलिया वि. आशिया क्वालिफायर
22 जानेवारी : पाकिस्तान वि.आयर्लंड
22 जानेवारी : दक्षिण आफ्रिका वि. आफ्रिका क्वालिफायर
23 जानेवारी : मलेशिया वि. वेस्टइंडिज
23 जानेवारी : भारत वि. श्रीलंका
24 जानेवारी : बी 4 वि. सी4
24 जानेवारी : ए4 वि. डी4
25 जानेवारी : सुपर सिक्स बी2 वि. सी3
25 जानेवारी : सुपर सिक्स बी1 वि. सी2
25 जानेवारी : सुपर सिक्स ए3 वि. डी1
25 जानेवारी : सुपर सिक्स सी1 वि. बी3
26 जानेवारी : सुपर सिक्स ए2 वि. डी3
26 जानेवारी : सुपर सिक्स ए1 वि. डी2
27 जानेवारी : सुपर सिक्स बी1 वि. सी3
28 जानेवारी : सुपर सिक्स ए3 वि. डी2
28 जानेवारी : सुपर सिक्स सी1 वि. बी2
28 जानेवारी : सुपर सिक्स ए1 वि. डी3
29 जानेवारी : सुपर सिक्स सी2 वि. बी3
29 जानेवारी : सुपर सिक्स ए2 वि. डी1
31 जानेवारी : सेमी फायनल 1
31 जानेवारी : सेमी फायनल 2
2 फेब्रुवारी : फायनल सामना