19.4 C
New York

Nagpur Court : धक्कादायक! युक्तिवाद सुरु असतानाच वकिलाला हृदयविकाराचा झटका

Published:

नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. (Nagpur Court) नागपूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दिवाणी खटल्याचा युक्तिवाद करणाऱ्या वकिलाचा युक्तिवाद चालू असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला झाला आहे. यामुळे विधी क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nagpur Court युक्तिवाद चालू होता

दिवाणी प्रकरणावर जिल्हा न्यायालयात युक्तिवाद सुरू असताना वकील तलत इक्बाल कुरैशी यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला. तेव्हा न्यायाधीश एस. बी. पवार यांनी त्यांना त्यांच्या खासगी गाडीतून तातडीने रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं

Nagpur Court नागपूर जिल्हा न्यायालयातील प्रकार

नागपूर जिल्हा कोर्टात एक हृदयद्रावक घटना घडली. ज्येष्ठ वकील इकबाल कुरेशी (64) न्यायालयीन कामकाजासाठी सकाळी 11.30 वाजता जिल्हा न्यायालयात पोहचले. सातव्या मजल्यावरील दिवाणी न्यायालयात त्यांच्या एका प्रकरणावर सुनावणी होणार होती. प्राथमिक सुनावणीत त्यांनी कोर्टाला प्रकरणाची माहिती दिली आणि न्यायनिवाडे सादर केले. त्यानंतर ते खुर्चीत बसले. प्रतिपक्षाच्या वकिलांनी बाजू मांडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी कुरेशी हे खुर्चीतून खाली कोसळले.

‘या लोकप्रिय टिव्ही शो चा कंटेंट वापराल तर.. दिल्ली उच्च न्यायालयाचा इशारा

Nagpur Court न्याय‍धीश आले धावून

न्याय‍ाधीश एस. बी. पवार यांच्यासमोरच हा प्रकार घडला. ते न्यायासनावरुन उठले आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने वेळ न दवडता कुरेशी यांना रुग्णालयात घेऊन जाण्याची धावपळ केली. न्यायालयात स्ट्रेचर उपलब्ध नव्हते. त्यांना खूर्चीवर बसवून लागलीच तळमजल्यावर आणण्यात आले.

न्यायाधीश पवार यांनी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष रोशन बागडे आणि इतर सदस्यांना याची माहिती दिली. कुरेशी यांना स्वतःच्या वाहनातून तताडीने जवळच्या रुग्णालयात नेले. पण कुरेशी यांना वाचवण्याची शर्थ व्यर्थ ठरली. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषीत केले. कोरोना काळात कुरेशी यांच्या पत्नीचे निधन झाले. दोन मुलींचे लग्न झालेले आहेत. कुरेशी हे एकटेच राहत होते. न्यायालयीन कामकाजानिमित्त ते जिल्हा न्यायालयात आले होते.

Nagpur Court आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

नागपूर जिल्हा न्यायालयात दररोज जवळपास 8,000 वकील काम करतात. न्यायालयीन कर्मचारी वर्ग पण मोठ्या प्रमाणात आहे. तर न्यायालयीन कामकाजासाठी जिल्हाभरातून हजारो लोक न्यायालयात येतात. त्यामुळे जिल्हा न्यायालयात एक अँम्बुलन्स आणि प्राथमिक उपचाराची सोय असावी अशी मागणी वकील आणि वकील संघाने केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img