17.2 C
New York

Mumbai Airport : मुंबई विमानतळावरून 4.83 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

Published:

मुंबई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Mumbai Airport) 4.83 कोटी रुपयांच कोकेन जप्त करण्यात आले आहेत. कस्टम्स विभागाने ही कारवाई केली असून, अदिस अबाबावरून आलेल्या केनियन (Kenyan) प्रवाशाला अटक (Arrested) करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केनियन नागरिक आदिस अबाबा येथून इथियोपियन एअरलाइन्सच्या फ्लाइटने मुंबई दाखल झाला. मुंबई विमानतळावर एक परदेशी नागरिक अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी मुंबईत येत असल्याची माहिती पोलिसांना आधीच मिळाली होती. या माहितीच्या आधारे मुंबई सीमा शुल्क आयुक्तालयाने एका केनियन नागरिकाला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्या गुप्तांगामधून 482.66 ग्रॅम कोकन जप्त करण्यात आले. या कोकेनची किंमत 4.83 कोटी रुपये इतकी आहे.

दरम्यान, कालच 17 ऑगस्ट नैरोबीहून मुंबईत कोकेनची तस्करी करणाऱ्या महिलेला डीआरआयने मुंबई विमानतळावरच अटक केली. महिलेकडून जप्त करण्यात आलेले कोकेन हे द्रव स्वरुपातील होते. विमानतळावर उतरल्यानंतर तपासणी करताना महिलेच्या बॅगेत दोन शॅम्पू आणि लोशनच्या बॉटल्स आढळल्या. या बॉटल्सची तपासण केली द्रव पदार्थ आढळला. त्याची चाचणी केल्यावर हे कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर महिलेला अटक करण्यात आली. संबंधित महिलेकडून जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत 4.83 कोटी रुपये इतकी आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img