21 C
New York

Ladki Bahin Yojana : ‘लाडक्या बहीणी’चे पैसे चक्क ‘भावा’च्या खात्यात; अर्ज न करता मिळाले पैसे!

Published:

यवतमाळ

राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेची महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहे. या योजनेत लाभार्थी ठरलेल्या महिलांच्या खात्यात हळुहळू पैसे जमा व्हायला सुरूवात झाली आहे. मात्र यवतमाळमधून एक वेगळीच घटना समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत (Ladki Bahin Yojana) ना कोणताही अर्ज केला, ना कागदपत्रे समबिट केली होती. तरी देखील लाडक्या बहिणीचे पैसे भावाच्या खात्यात पोहोचल्याची घटना घडली आहे. त्यामुळे या घटनेने आश्चर्य व्यक्त होत आहे.

जाफर शेख असे या तरुणाचे नाव आहे. तो आर्णी शहरातील हाफीज बेग नगरातील रहिवासी आहे. सुशिक्षित बेरोजगार असलेल्या जाफर शेख याने लाडकी बहीण योजनेसाठी किंवा इतर कोणत्याही योजनेसाठी अर्ज भरला नव्हता. तरीही शुक्रवारी त्याच्या बँक खात्यात या योजनेचे तीन हजार रुपये शासनाने जमा केले आहे. या प्रकाराने खुद्द जाफरही आश्चर्यचकित झाला आहे. अनेक महिलांनी गर्दीत रेटारेटी करून लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून त्यांची धावपळ सुरू होती. मात्र, आधार लिंक नसल्याच्या कारणाखाली अजूनही अनेक महिलांचे पैसे जमा झालेले नाही.

दरम्यान, जाफर शेख या तरुणाने साधा अर्जही केलेला नसताना त्याच्या खात्यात तीन हजार जमा झाल्याने शासनाच्या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या तरुणाच्या खाते बँक ऑफ बडोदामध्ये असून, पैसे जमा झाल्याचा एसएमएसही त्याला मिळाला. याप्रकरणी बँकेने अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img