23.1 C
New York

Weather Update : आज राज्यात मुसळधार, हवामान विभागाचा ‘या’ भागात यलो अलर्ट जारी

Published:

राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती (Weather Update) घेतली आहे. काही ठिकाणी तुरळक स्वरुपात पाऊस होत आहे. आता मात्र पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून मुसळधार पावसाची (Heavy Rainfall) चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाने आज राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा इशारा दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

राज्यात पावसाने मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतली होती. काही भागात मात्र तुरळक सरी बरसत होत्या. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली आहे. जुलै महिन्यात राज्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला होता. मात्र ऑगस्ट महिना उजाडला तसा पावसाने ब्रेक घेतला.

रशियात भूकंप! रिश्टर स्केलवर भूकंपाची 7 इतकी तीव्रता

मुंबई उपनगरात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होत होता. पाऊस कमी झाल्याने अनेक ठिकाणी पुन्हा उकाडा जाणवू लागला आहे. मुंबई, ठाणे, पालघर या भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस होईल अशी शक्यता आहे. या काळात हवामान ढगाळ राहिल. काही भागात पाऊस होईल तर काही ठिकाणी हवामान कोरडे राहिल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नदी नाल्यांसह धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झालीय. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज राज्यात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जाणून घेऊयात हवामान विभागाचा सविस्तर अंदाज.

Weather Update मुंबईमध्ये उकाडा

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून जुलै अखेरीस झालेल्या मुसळधार पावसाने विश्रांती घेतली आहे. मुंबईसह उपनगरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसत आहेत. पुन्हा एकदा पाऊस ओसरल्यानं उकाडा जाणवू लागला आहे. दरम्यान, पुढील काही दिवस हवामान (Maharashtra Weather Update) विभागाने मुंबई तसेच ठाणे, पालघर भागात हलक्या सरींचा अंदाजव्यक्त केला आहे. शहर परिसरात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला काही भागात पाऊस झाला. मात्र, त्यानंतर पावसाची दडी मारली आहे. काही भागात अधूनमधून पाऊस कोसळत आहेत. परंतु मुसळधार पाऊस ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेला नाही. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागत आहे. दरम्यान, पुढील काही दिवस मुंबईत अशीच स्थिती कायम असणार आहे. मात्र काही भागात हलक्या सरी कोसळतील. या काळात संपूर्ण दिवसभर ढगाळ वातावरण राहील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img