17.2 C
New York

Duplicate Garlic : लसूण खाणाऱ्यांच्या हृदयात धडकी..! बाजारात चक्क सिमेंटच्या लसणाची सर्रास विक्री

Published:

अकोला

स्वयंपाक घरात कांद्यानंतर अत्यंत गरजेचा पदार्थ म्हणजे लसूण. मात्र सध्या लसणाचे भाव गगनाला भिडल्याने लसूण सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. याचा फायदा लसणाचा (Duplicate Garlic) काळाबाजार करणारे घेत असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. अकोल्यात (Akola) चक्क सिमेंटचा लसूण विक्री होत असल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या विचित्र फसवणुकीमुळे लोक आश्चर्यचिकत झाले आहेत. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अशा बोगस विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी देखील अनेकांनी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यामध्ये बाजोरिया नगर परिसरात सुधाकर पाटील आणि त्यांच्या पत्नि राहतात. सुधाकर पाटील पोलीस विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी त्यांच्या घरासमोर असलेल्या एका फेरीवाल्याडून लसूण विकत घेतली. लसूण दिसायला इतर लसणांप्रमाणेच होती. लसूण खरेदी केल्यानंतर सुधाकर पाटील घरी आले आणि त्यांनी लसणीच्या पाकळ्या वेगळ्या करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्या पाकळ्या लसणीपासून वेगळ्या होत नव्हत्या. त्यामुळे सुधाकर पाटील यांनी चाकूच्या साहाय्याने ती लसूण कापली, तेव्हा त्या लसणीच्या आत सिमेंट पाहायला मिळालं. आर्टिफिशियल पद्धतीने सिमेंटचा वापर करून ह्या लसणीच्या पाकळ्या तयार करण्यात आल्याचं समोर आलं.

आर्टिफिशियल सिमेंटच्या या लसणाच्या गाठीचे वजन १०० ग्रॅम इतकं असतं. काळाबाजार करणाऱ्या विक्रेत्यांकडून अशा फसणूकीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडतात. सध्या अनेक शहरांमध्ये लसणांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे काळाबाजार करणारे विक्रेते या गोष्टींचा फायदा घेऊन नागरिकांची फसवणूक करत आहेत. अशा परिस्थितीत कोणतीही वस्तू खरेदी करताना नागरिकांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img