16.8 C
New York

Chhatrapati Sambhajinagar : बिस्कीटातून जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा

Published:

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील पैठणमधील केकत जळगाव येथील शाळेत विषबाधा विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये विषबाधा झालेल्या मुलांचा आकडा 257 वर गेला. (Sambhajinagar) त्यातील साद विद्यार्थ्यांची तब्येत खालावली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरला हलवलं आहे.

Chhatrapati Sambhajinagar पुढील उपचार संभाजीनगरला

बिस्किटांमुळे जिल्हा परिषद शाळेतील विषबाधा झाल्याचे उघड झाल्याने विद्यार्थ्यांचे पालक संतापले आहेत. विषबाधा होण्याचे प्रकार शाळेत दिल्या जाणाऱ्या खाद्यामधून अलीकडे वाढल्याचं दिसत असताना पालकांमध्ये घबराट पसरू लागली आहे. विद्यार्थ्यांना बिस्किट देण्याआधी त्याची मुदत तपासली गेली होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान पुरक आहारात दिलेली सुट्टी बिस्किटे खाल्ल्याने विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या. यातील अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यातील सात विद्यार्थ्यांवरती प्राथमिक उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी या विद्यार्थ्यांचे प्रकृती आणखीनच खालावल्याने पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.

मुंबई विमानतळावरून 4.83 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

Chhatrapati Sambhajinagar ग्रामीण रुग्णालयात

पैठणल येथील केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळा इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत आहे. या शाळेत 286 विद्यार्थी शिक्षण घेत असून शनिवारी अर्धी शाळा असल्याने सकाळी पूरक आहार म्हणून सुट्टी बिस्किटे देण्यात आली. बिस्किटे खाताच विद्यार्थ्यांना पोट दुखून मळमळ व उलट्या होऊ लागल्या. शाळेत हजर असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना एका मागे एकच त्रास होऊ लागल्याने तातडीने पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. विषबाधा झाल्याची माहिती मिळताच विद्यार्थ्यांचे पालक तसंच गावकऱ्यांनी शाळेत धाव घेत विद्यार्थ्यांना मिळेल त्या वाहनाने दवाखान्यात दाखल केलं. त्यातील अडीचशे विद्यार्थ्यांना शनिवारी डिस्चार्जही देण्यात आला होता. मात्र,आज सकाळी त्यातील काही विद्यार्थ्यांची प्रकृती आणखीनच खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने छत्रपती संभाजीनगर येथे हलवण्यात आले आहे.

Chhatrapati Sambhajinagar 253 विद्यार्थी

केकत जळगाव येथील जिल्हा परिषदेतील 253 विद्यार्थ्यांपैकी सात विद्यार्थ्यांची प्रकृती सौम्य ते गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगरचा सिविल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचं पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img