23.1 C
New York

MVA : महाविकास आघाडीवर मुस्लिम समाजाची नाराजी ?

Published:

लोकसभेच्या 48 जागांपैकी एकही जागी उमेदवार दिला गेला नाही. (MVA) त्यावेळेस मुसलमान समाजाची नाराजी होती. मोदी सरकार हटवण्यासाठी मुस्लिम समुदायाने 90% मतदान महाविकास आघाडीला केलं. मुस्लिम समुदायाला संधी न दिल्यामुळे महाविकास आघाडीवर समाजाची थोडी नाराजी आहे. आता आगामी विधानसभा निवडणूक ज्या ठिकाणी मुस्लिम समुदाय जास्त आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा, असं माजी खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई म्हणालेत. हुसेन दलवाई सोलापुरात आहेत. तिथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.

MVA मुस्लिम उमेदवार द्या- हुसेन दलवाई

राज्यात ज्या विधानसभा मतदार संघात 50% अधिक मुसलमान समाजाची संख्या आहे. त्या ठिकाणी महाविकास आघाडीने मुस्लिम उमेदवार द्यावा. राज्यातील 32 जागांवर मुस्लिम समुदायाचे निर्णायक मतदान आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी यांच्याकडेदेखील जागा देण्याची मागणी आहे. खासदार प्रणिती शिंदे यांच्या सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघात मुसलमान उमेदवार द्यावा, अशी मागणी हुसेन दलवाई यांनी केली आहे.

भाजपसाठी हरियाणा टफ! नवा फॉर्म्यूला काय?

MVA विधानसभा निवडणुकीबाबत म्हणाले…

जम्मू आणि काश्मीरसोबत महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अपेक्षित होती. मात्र राज्य सरकार घाबरलेलं आहे. त्यामुळे त्यांनी अधिकचा वेळ मागितला आहे. दिवाळीनंतर निवडणुका व्हाव्यात असे राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहेत. मात्र तेव्हा जरी निवडणुका झाल्या तरी महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र येणार आहे, असं हुसेन दलवाई म्हणाले.

MVA एकनाथ शिंदेवर निशाणा

हुसेन दलवाई यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. जर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे, असं ते म्हणाले. रामगिरी महाराजांच्या व्यासपीठावर जाऊन मुख्यमंत्र्यानी वक्तव्य केलं मी त्याचा निषेध व्यक्त करतो. रामगिरी महाराजांनी जे वक्तव्य केले आहे त्यामुळे त्यांना अटक केली पाहिजे. जर समाजात वितुष्ट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असेल तर अश्या मुख्यमंत्र्यांना हटवलं पाहिजे. असला मुख्यमंत्री महाराष्ट्रात चालू शकत नाही. मुख्यमंत्र्यांनी डोकं चालवून काम करावं, असं दलवाई यांनी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img