निर्भयसिंह राणे
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी ही माहिती दिली की भारतात ICC महिला T20 विश्वचषक आयोजित करणार नाही. “त्यांनी (आयसीसी) आम्हाला विचारले की आम्ही विश्वचषक आयोजित करू का. मी स्पष्टपणे नाही म्हटले आहे,” शाह यांनी बुधवारी TOI च्या मुंबई कार्यालयात टाइम्स ग्रुपच्या पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या अशांतता पाहता हा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. आयसीसीसमोर विश्वचषक स्थलांतरित करण्यासाठी भारताचा पर्याय म्हणून विचार करण्यात आला. शाह यांनी बीसीसीआयची भूमिका स्पष्ट केली. “आमच्याकडे सध्या पावसाळा सुरू आहे आणि त्या व्यतिरिक्त आम्ही पुढील वर्षी महिला एकदिवसीय विश्वचषकाचे आयोजन करू. आम्हाला असे कोणतेही संकेत जगाला द्यायचे नाहीत की भारत सलग विश्वचषक होस्ट करत आहे.
बांगलादेशविरुद्धची आगामी मायदेशातील मालिका बीसीसीआयसाठी महत्त्वाची असल्याचे त्याने स्पष्ट केले. “आम्ही त्यांच्याशी (बांगलादेश अधिकाऱ्यांशी बोललो नाही. नवीन सरकारने तिथे पदभार स्वीकारला आहे. ते कदाचित आमच्यापर्यंत पोहोचतील नाहीतर मी त्यांच्याशी संपर्क करेन. बांगलादेश मालिका आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे.” 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेत भारत दोन कसोटी आणि तीन T-20 सामाना खेळणार आहे.