23.1 C
New York

Assembly Elections : उद्धव ठाकरेंकडे संभाजी ब्रिगेडने मागितल्या ‘इतक्या’ जागा

Published:

ठाणे

राज्यातील विधानसभेच्या निवडणुका (Assembly Elections) तोंडावर आहेत. या निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Elections) घवघवीत यश संपादन केल्याने महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) कॉन्फिडन्स चांगलेच वाढले आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचा (Uddhav Thackeray) मित्रपक्ष असलेल्या संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Brigade) आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणूक रिंगणात उतरणार असल्याची घोषणा केली आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी संभाजी ब्रिगेडने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे विधानसभेसाठी 25 जागा मागितल्या आहेत. आमच्याकडून निवडणूक लढण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे इतक्या जागा संभाजी ब्रिगेडला सोडाव्यात अशी एक मोठी घोषणा केली आहे.

राज्यातील विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली असल्याने सध्या सर्वच पक्ष जोमाने तयारी करीत आहेत. विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी संभाजी ब्रिगेडने केली आहे. आमच्याकडून निवडणूक लढण्यास अनेक जण इच्छुक असल्याचे सांगत त्यासाठी पक्षाने उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 जागा मागितल्या आहेत.

ठाण्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडची एक महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांच्या अध्यक्षतेखाली अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला ठाणे जिल्हा अध्यक्षांसह इतर जिल्हाध्यक्षही उपस्थित होते.या बैठकीत संभाजी ब्रिगेडचे पक्षप्रमुख मनोज आखरे यांनी विधानसभा निवडणुकीबद्दल भाष्य केले.

येत्या काळात होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण केली आहे. आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडे 25 जागांची मागणी केली आहे. त्याबद्दल चर्चा होईल. आमची ठाकरे गटासोबत युती आहे. संभाजी ब्रिगेडची विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि इतर भागात ताकद आहे, असे मनोज आखरे यांनी यावेळी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img