26.6 C
New York

Vinesh Phogat : विनेश फोगट भारतात दाखल

Published:

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजन वाढल्यामुळे अंतिम सामन्याला मुकलेल्या कुस्तीपटू विनेश फोगटचं (Vinesh Phogat) भारतात जंगी स्वागत करण्यात आले आहे. विनेशच्या स्वागतावेळी ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया आणि साक्षी मलिक उपस्थित होते. यावेळी या दोघांनीही विनेशचे सांत्वन केले. यावेळी विनेशला अश्रू अनावर झाल्याचे पाहण्यास मिळाले.

Vinesh Phogat चॅम्पियनप्रमाणे होणार सन्मान

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) अपात्र ठरल्यानंतर विनेश फोगटला एकही पदक जिंकता आले नाही. असे असूनही तिचे सुवर्णपदक विजेत्याप्रमाणे स्वागत केले जाईल असे हरियाणा सरकारने जाहीर केले आहे. एवढेच नव्हे तर, तिच्या बलाळी गावातील क्रीडा स्टेडियममध्ये सत्कार समारंभाची जय्यत तयारी सुरू असून, विनेशच्या स्वागतासाठी संपूर्ण गावात उत्साह आहे. हरियाणा सरकारने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेत्याला 6 कोटी रुपये, रौप्यपदक विजेत्याला 4 कोटी रुपये आणि कांस्यपदक विजेत्याला 2.5 कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती.

चॅम्पियन्स ट्रॉफी दुसऱ्या देशात शिफ्ट होणार?

विनेश फोगटला रौप्यपदकाची खात्री होती. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी अवघ्या 100 ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) मध्ये संयुक्त रौप्य पदकासाठी याचिका दाखल केली होती. पण तेथे ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे तिचे रौप्य पदकाचेही स्वप्न भंगले. मात्र, असे असतानाही हरियाणा सरकारकडून विनेशला 4 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार आहे. याशिवाय पानिपतच्या अजय पहेलवान ग्रुपच्या तरुणांनी विनेश फोगटला दोन एकर जमीन आणि 11 लाख रुपये रोख देण्याची घोषणा केली आहे.

Vinesh Phogat CAS ने याचिका फेटाळली

पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर विनेशचे रौप्यपदक निश्चित झाले होते. पण, अंतिमफेरीला अवघे काही तास उरलेले असताना विनेशचे वजन 100 ग्रॅमने अतिरिक्त भरले. यानंतर तिने वजन कमी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. पण तिला यात यश आले नाही. अतिरिक्त वाढलेल्या वजनामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यानंतर विनिशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्समध्ये (CAS) संयुक्त रौप्य पदकासाठी याचिका दाखल केली होती. सीएएसने या खटल्याची सुनावणी केली आणि एवढेच नव्हे तर, या प्रकरणावरील निर्णय तीनदा पुढे ढकलला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी CAS ने विनेशची याचिका फेटाळून लावली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img