2.5 C
New York

Uddhav Thackeray : ‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार’, ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचं लॉबिंग

Published:

राज्यात विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या असतानाच महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदावरून कलगीतुरा रंगला आहे. शुक्रवारी मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) काँग्रेस आणि राष्ट्रवादीने उमेदवार (Congress Party) जाहीर करावा त्याला मी पाठिंबा देईल असे वक्तव्य केले होते. दुसरीकडे ठाकरे गटातील नेते उद्धव ठाकरेंनाच मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट करू लागले आहेत. याच प्रयत्नात आता खासदार ओम राजे निंबाळकरांची (Om Raje Nimbalkar) भर पडली आहे.

उद्धव ठाकरे यांना सत्ता सोडावी लागली त्यावेळेस त्यांना कुठलाही खुर्चीचा मोह नव्हता. खुर्चीला चिटकून न राहता त्यांनी लगेच राजीनामा देऊन बाजूला झाले. वर्षा बंगल्यातून मातोश्रीत जात असताना ज्या माणसांचा राजकारणाशी काही संबंध नाही त्या नागरिकांच्या डोळ्यात पाणी होतं. तीच जनता त्यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करेल असा विश्वास ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. कर्जत जामखेड येथे रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आयोजित केलेल्या सत्कार समारंभास खासदार ओमराजे यांनी हजेरी लावली होती. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री होतील असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलताना निंबाळकर म्हणाले, उद्धव ठाकरे हे मुरब्बी राजकारणी नाहीत. सर्वसामान्य आणि कौटुंबिक माणूस आहे. त्यांना खुर्चीचा कुठलाही मोह नाही. कोरोनाच्या (Corona Virus) काळात त्यांनी कुटुंब म्हणून महाराष्ट्राला सांभाळलं. येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत (Maharashtra Elections 2024) जनता पुन्हा एकदा त्यांना त्या खुर्चीवर बसवल्याशिवाय राहणार नाही, असं निंबाळकर म्हणाले.

राहुल गांधींच्या जाहीर सभेवर मुंबई वाहतूक पोलिसांचा आक्षेप

Uddhav Thackeray उद्धव ठाकरे काय म्हणाले ?

गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल अशी चर्चा आहे. उद्धव ठाकरे होणार की आणखी (Maharashtra News) कोण होणार अशी ही चर्चा आहे. परंतु, या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार आहेत, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण उपस्थित आहेत. यांना माझं सांगण आहे की आपण करा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर माझा त्याला पाठिंबा असेल असे उद्धव ठाकरे काल मुंबईतील (Mumbai News) महाविकास आघाडीच्या मेळाव्यात म्हणाले होते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img