-4.5 C
New York

Sabarmati Express : ‘साबरमती’चा अपघात की षडयंत्र?

Published:

साबरमती एक्सप्रेस अपघात प्रकरणात (Sabarmati Express) आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी (Ashwini Vaishnaw) मोठी प्रतिक्रिया दिली आहे. साबरमती एक्सप्रेसचे इंजिन आज सकाळी अडीच वाजता कानपूर जवळ रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या एका वस्तूवर आदळले. या धक्क्याने रेल्वे रुळावरून खाली उतरली. काहीतरी आदळल्याची चिन्हे दिसत आहेत. पुरावे सुरक्षित ठेवण्यात आले आहेत. आयबी आणि यूपी पोलीस (UP Police) तपास करत आहेत असे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रेन नंबर 19168 साबरमती एक्सप्रेस (वाराणसी-अहमदाबाद) अहमदाबादकडे (Indian Railways) निघाली होती. कानपूर येथील भिमसेन खिंडमध्ये गोविंदपुरी (Kanpur) स्टेशनजवळ शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास रेल्वे अचानक रुळावरून घसरली. या घटनेत रेल्वेचे (Train Accident) 22 डबे रुळावरून घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Sabarmati Express ड्रायव्हरने सांगितलं नेमकं काय घडलं?

रेल्वे चालकाने दिलेल्या माहितीनुसार बोल्डर इंजिनला धडकले यामुळे इंजिनचे कॅटल गार्डचे मोठे नुकसान झाले. यानंतर रेल्वेचे डबे खाली घसरले. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था केली आहे. प्रवाशांना बसमधून कानपुरला पाठविण्यात येत आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी ठाण मांडून आहेत. कानपूर सिटी एडीएम राकेश वर्मा यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले की 22 डबे रुळावरून घसरले आहेत. यात कुणीही जखमी झालेले नाही. सर्व प्रवाशांना बसद्वारे कानपुरला पाठविण्यात येत आहे. मेमो ट्रे्नचीही व्यवस्था करण्यात आली आहे. रेल्वेने हेल्पलाइन नंबर जारी केले आहेत. या अपघातानंतर काही रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. काही रेल्वेचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली; मध्यरात्रीच्या घटनेने प्रवाशांत घबराट

Sabarmati Express अचानक जोराचा आवाज आला अन्..

कानपूर येथून निघाल्यानंतर थोड्याच वेळेत आम्हाला जोराचा आवाज ऐकू आला आणि डब्यातील सर्व काही हलायला लागले. आम्ही खूप घाबरलो होतो त्याचवेळी रेल्वे थांबल्याचे आमच्या लक्षात आले. या घटनेनंतर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवर पोस्ट लिहिली. साबरमती रेल्वेचे इंजिन रेल्वे ट्रॅकवर ठेवलेल्या कोणत्या तरी वस्तूवर आदळले त्यानंतर रेल्वे रुळावरून घसरली. आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीस घटनास्थळी तैनात आहेत. रेल्वेतील कुणीही प्रवासी जखमी झालेले नाही. प्रवाशांना त्यांच्या गंतव्य ठिकाणी जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img