3.5 C
New York

Prithviraj Chavan : उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ विधाणावर पृथ्वीराज चव्हाण म्हणाले…

Published:

आपल्यात काड्या घालणारी लोकं युतीमध्ये बसली आहेत. मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण? उद्धव ठाकरे होणार की आणखी कोणी होणार? असं विचारलं जात आहे. आज सगळ्यांसमोर पण मी सांगतो… शरद पवारसाहेब इथे आहेत, पृथ्वीराज चव्हाण आहेत, मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा तुम्ही आता तुमच्यातील कोणालाही घोषित करा,उद्धव ठाकरेंनी माझा त्याला पाठिंबा असेल, असं विधान केलं होतं. उद्धव ठाकरेंच्या या विधानावर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुख्यमंत्री पदाचा चेहरा संदर्भात उद्धव ठाकरे (Uddhav Thacleray) स्पष्ट बोललेले आहेत. उद्धव ठाकरे आणि आमच्या पक्षश्रेष्ठींची चर्चा झालेली आहे. पण ज्यांचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री झाला तर पाडापाडी होते असं मला वाटत नाही. जागावाटप आणि निवडणुकांना समोर महाविकास आघाडी म्हणून जाण्याची प्राथमिकता आहे. आमची प्राथमिकता चेहरा ही नाही, असं पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी स्पष्ट केलं आहे. त्यांचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं, आमचं मत आम्ही व्यक्त केलं आहे. मुख्यमंत्रिपदाचा विषयच नाही, आम्ही निवडणुकीच्या तयारीला आधी लागलो आहोत, पृथ्वीराज चव्हाण अशी माहिती यांनी दिली. तसेच लवकरच आमची चर्चा जागा वाटपाच्या संदर्भात सुरू होईल, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

…म्हणून तुम्ही घड्याळाचं बटन दाबा, जन सन्मान यात्रेत अजित पवारांचं वक्तव्य

Prithviraj Chavan महाराष्ट्रातील निवडणुका घेण्यास काही हरकत नव्हती-

निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर या निवडणुका पुढे ढकलल्या जातील त्याची स्पष्टता आली. महाराष्ट्रातील निवडणुका घेण्यास काही हरकत नव्हती. मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाचं म्हणणं देखील समजून घ्यायला हवं, असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. काही जिल्ह्यांमध्ये हिंसाचार सुरू आहे हे राज्यासाठी वाईट आहे. गृहमंत्र्यांची राज्यात सुरक्षा व्यवस्थीत ठेवणं ही जबाबदारी आहे. ही सरकारची जबाबदारी असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय. सर्वांनी शांतता बाळगली पाहिजे असं आवाहन देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.

Prithviraj Chavan उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

आम्ही जो अनुभव भाजपच्या युतीत असताना घेतला, आम्हाला त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको. आम्ही 30 शिवसेना आणि भाजपाच्या युतीत होतो. आमच्या युतीत जागा जाहीर व्हायच्या. बैठका व्हायच्या. ज्याच्या जागा जास्त येतील, त्याचा मुख्यमंत्री, असं जाहीर केलं जायचं. एकमेकांच्या पायावर धोडे टाकण्यासाठी आम्ही हेच धोरण वापरायचो. त्यामुळे पाडापाडीच्या राजकारणात युतीला काहीही महत्त्व राहिलं नाही, अशी खंत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या मेळाव्यात बोलून दाखवली होती.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img