Atal Setu Viral Video : अटल सेतू वरील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय . परंतु त्याच वेळी वाहतूक पोलीस शाखेचे पोलीस तेथे आले आणि त्यांनी प्रसंगावधान दाखवून त्या महिलेचा जीव वाचवला. अटल सेतूवरील हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. परंतु, मी आत्महत्या करत नव्हते तर देवांचे फोटो समुद्रात फेकत होते असं या संबंधित महिलेने पोलिसांना सांगितले असल्याचे त्या महिलेने पोलिसाना सांगितलं.
ही महिला कॅबने १६ ऑगस्ट रोजी मुलुंड वरून अटल सेतूवर आली. तिने अटल सेतूवर कॅब थांबवायला सांगितली. कॅबमधून उतरताच ती रेलिंगच्या पलिकडे उभी राहिली. हा प्रकार कॅबचालकाने पाहिला. त्यामुळे त्याने प्रसांगवधान राखत महिलेला धरून ठेवले. याच काळात गस्तीवर असलेले पोलीस तिथे पोहोचले. या पोलिसांनी तिला बाहेर काढले.
मुलुंड येथे राहणाऱ्या या ५६ वर्षीय महिलेचं नाव रीमा पटेल असं असून, ती देवांचे फोटो समुद्रात विसर्जित करत होती, असं तिने पोलिसांच्या जबानीत म्हटलं आहे. दरम्यान पोलीस निरीक्षक गुल्फरोज मुजावार असे म्हणाले, “आम्ही या रस्त्यावर आमची पेट्रोलिंग व्हॅन गस्त घालत असताना त्यांना तिथे एक कार उभी असलेली दिसली. “तसेच, शेलार टोल नाक्याच्या टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांनी पुलावर एक कार थांबलेली आणि एक महिला रेलिंगवर उभी असल्याचे दिसल्याने त्यांनी पोलिस पथकाला सतर्क केले होते.”
Atal Setu Viral Video कॅबचालकाच्या प्रसांगवधनामुळे…
संबंधित महिला आधी ऐरोली पुलावर गेली होती. आध्यत्मिक गुरूंनी तिला देवांचे फोटो समुद्रात फेकायला सांगितलं असल्यामुळे ती अटल सेतू वर आली,असं ती म्हणाली. ती एक एक करून फोटो समुद्रात टाकत होती. तेवढ्यातच तिला पोलिसांच्या जीपचा आवाज आला आणि अचानक त्या महिलेचा तोल गेला आणि ती पडली. याच काळात तिकडे असलेल्या कॅब चालकाला संशय आला. तो रेलिंगच्या अलीकडेच उभा होता. त्यामुळे ती जेव्हा खाली पडली तेव्हा त्या चालकाने तिच्या केसांना पकडून ठेवले. आणि तेवढ्यातच तिथे पोलीस आले आणि, त्यांनी त्या महिलेची सुटका केली.
ती अपत्यहीन आणि काही दिवसांपासून मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याच पोलिसांनी सांगितलं. या घटनेवेळी तिचा पती पुण्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.