महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना सुरू केली असून, लाखो महिलांच्या खात्यात पैसेदेखील जमा होण्यास सुरूवात झाली आहे. अल्पावधित लोकप्रिय झालेल्या राज्य सरकारच्या या योजनेला उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. मात्र, सरकारी ही योजना विधानससभा निवडणुका तोंडासमोर ठेवून जाहीर करण्यात आली असून, लाडक्या बहिणींना देण्यात येणारी ही रक्कम परत घेतली जाणार असल्याचे विरोधकांकडून वेळोवेळी सांगितले जात आहे. विरोधकांच्या या भूमिकेवर अजितदादांनी आज (दि.17) आळंदीत विरोधकांना ‘शोलो’ स्टाईलने इशारा दिला आहे.
आळंदीत आज राष्ट्रवादीत पक्षाच्या जनसन्मान यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अजित पवारांनी पोलीस पाटलांचं मानधन वाढवलं, कोतवालाचं मानधन वाढवलं, आशासेविका, गट प्रवतर्क याशिवाय अंगणवाडी सेविकांचेही मानधन वाढवल्याचे सांगितले. यावेळी एकाने कानात येऊन सांगितलं की, सरपंचाचही मानधन वाढवा अशी मागणी केली. त्यावर अजितदादांनी तुम्ही आम्हाला संधी द्या सरपंचाचही मानधन वाढवतो काळजी करू नका असा शब्द दिला.
…म्हणून खासदार केलं, श्रीकांत शिंदेंबद्दल राऊतांचं वादग्रस्त वक्तव्य
Ajit Pawar आम्ही घेणारे नाही देणारे आहोत
पुढे बोलताना अजितदादांनी शेवटी आम्ही देणारे आहोत घेणारे नाहीत. तुम्हाला कुणी काही सांगेल की, दिलेले पैसे परत घेतील. पण कोण मायकालाल पैसे परत घेऊ शकत नाही. कुणी जर तसं सांगितलं तर मला फोन करून सांगा बघतो त्याच्याकडे कसं काय ते. त्याला पोलिसांच्याच ताब्यात देतो आणि चक्की पिसिंग अँड पिसिंग करायला लावतो अशा कठोर शब्दांत लाडकी बहीण योजनेवरून विरोध करणाऱ्या विरोधकांना ठणकावलं आहे. हे पैसे तुमचा मान आणि सन्मान आहे. हे पैसे तुमचे आहेत आणि ते तुम्हाला दिलेले आहेत. त्यामुळे असे हौसे नवसे गवसे काही तरी बोलत असतात त्यांच्यावर विश्वास ठेऊन नका असे आवाहन अजितदादांनी उपस्थितांना केले.