मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण (Ladki Bahin) या महायुती सरकारने आणलेल्या योजनेची सध्या राज्यात जोरदार चर्चा आहे. दरम्यान, या योजनेवरून अनेकदा खासदार सुप्रीया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर जोरदार प्रहार केले आहेत. दरम्यान, आज पुण्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राज्यस्तरीय लाभ वितरणाचा कार्यक्रम होणार आहे. त्यावरून जोरदार खडाजंगी सुरू आहे.
या कार्यक्रमासाठी लाभार्थी महिलांना या कार्यक्रमाला आणलं जाणार असू लाभार्थी महिलांना रक्कम जमा केल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. एका व्हायरल मेसेजमुळे विरोधकांनी सरकारवर सरकारकडून कार्यक्रमाची जय्यत तयारी केलेली असतानाच टीका केली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या एक्स ट्वीटरवर हा मेसेज पोस्ट केला आहे. त्यामुळे यावरून आता सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलच राजकारण तापलं आहे.
‘उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होणार’, ठाकरेंच्या आणखी एका खासदाराचं लॉबिंग
Supriya Sule काय आहे मेसेजमध्ये?
एक व्हॉट्सॲप मेसेज एक्स अकाऊंटवर खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. या मेसेजमध्ये लाभार्थी महिलांना आज बालेवाडी येथील कार्यक्रमाला हजर राहण्याचे फर्मान सोडण्यात आलं आहे. ज्या लाभार्थी महिला उपस्थित राहणार नाहीत, त्यांचे अर्ज रद्द केले जातील, असे या मेसेजमध्ये लिहिलेलं आहे. सुप्रिया सुळे यांनी या मेसेजनंतर नाराजी व्यक्त करत सरकारला इशारा दिला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या रक्कम अदा करण्याच्या कार्यक्रमाला हजर न राहणाऱ्या बहिणींचे फॉर्म रद्द करण्याचे धमकी देणारे हे स्वतःला ‘भाऊ’ म्हणतत आहेत. बहिणीला कार्यक्रमाला बोलावणार आणि त्यांची गर्दी दाखवून स्वतःची पाठ थोपटून घेणार. बहिण-भावाचं’ नातं एवढं स्वस्त अरे सत्तेत बसलेल्या भावांनो, ‘नसतं. प्रेमानं काही बहिणींना मागितलं तर बहिण त्याला नाही म्हणत नाही. पण तिला धमक्या देऊ लागलात तर ती कुणालाच घाबरत नाही हे लक्षात ठेवा. हिंमत असेल तर या कार्यक्रमाला न जाणाऱ्या एकातरी बहिणीचा फॉर्म रद्द करुन दाखवाच असंही सुप्रीया सुळे यामध्ये म्हणाल्या आहेत.