10.4 C
New York

Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाचे मोठं विधान, म्हणाले…

Published:

नवी दिल्ली

लोकसभेनंतर राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. राज्यात काही दिवसांत विधानसभा निवडणुकांची (Assembly Election) घोषणा होईल अशी शक्यता वर्तवली जात होती. याबाबत आता महत्वाची अपडेट समोर आली असून केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) विधानसभेच्या निवडणुकांबाबत मोठी माहिती दिली आहे. महाराष्ट्रामध्ये दिवाळीनंतरच विधानसभेच्या निवडणुका होतील, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

हरियाणा आणि जम्मू काश्मिर विधानसभा निवडणुकांबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाने सर्वात मोठी घोषणा केली आहे. आज केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी महत्वाची पत्रकार परिषद घेत हरियाणामध्ये १ ऑक्टोंबरला तर जम्मू- काश्मिरमध्ये तीन टप्प्यात निवडणूका होणार असल्याची घोषणा केली. यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांबाबत महत्वाचे संकेत दिले आहेत.

महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभेच्या निवडणुका यापूर्वी एकत्र झाल्या होत्या. यापूर्वी 3 निवडणुका एकत्र होत होत्या यावेळी 4 राज्यांच्या निवडणुका आहेत. आम्ही 2-2 राज्यांच्या निवडणुकासोबत घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात पाऊस झाला होता, त्यामुळं अनेक गोष्टी बाकी आहेत. गणेश उत्सव, दसरा, दिवाळी हे महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत सण-उत्सव आहेत. लवकरच महाराष्ट्राच्या निवडणुका जाहीर करूयात असे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img