23.1 C
New York

Uddhav Thackeray : शरद पवारांच्या समोर मुख्यमंत्रि‍पदाबाबत उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले…

Published:

मुंबई

आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Assembly Elections) मविआने कंबर कसली असून, महाविकास आघाडीने मुंबईतील (MUmbai) ष्णमुखानंद सभागृहात पहिला मेळावा पार पडत आहे. या मेळाव्यातील पहिल्या भाषणाचा मान उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) देण्यात आला. यावेळी ठाकरेंनी विधानसभेच्या जागावाटपापासून ते मोदी सरकारपर्यंतच्या (PM Narendra Modi) कारभारावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीची (Maha Vikas Aghadi) पहिल्यांदाच संयुक्त मेळावा होत आहे म्हणून यजमानपद स्वीकारुया असा मी विचार केल्याचे सांगतले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट केले. त्यांनी यासंबंधी आपला महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याला पाठिंबा असल्याची घोषणा केली. विधानसभा निवडणूक ही महाराष्ट्राची अस्मिता जपणारी असून, कोणत्याही स्थितीत महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचायचे हाच आमचा निर्धार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणालेत.

मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याद्वारे महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या घटकपक्षांत मुख्यमंत्रीपदावरून कोणतीही रस्सीखेच सुरू नसल्याचे स्पष्ट केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, या मेळाव्यात ओपनिंग बॅट्समॅनची भूमिका बजावुया असं मी ठरवलं. ओपनिंग बॅट्समनचं कसं असतं, चांगला स्कोअर केला तर केला नाहीतर बाकीचे प्लेअर खेळणारे आहेतच, त्यांची बॅटिंग बघू, असा माझा विचार होता, असे उद्धव ठाकरे मिश्किलपणे म्हणाले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, यावेळी ठाकरेंनी ज्याच्या जागा जास्त होतील त्याचा मुख्यमंत्री हे धोरण राबवण्यापेक्षा अगोदर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार ठरवा आणि पुढे चला. त्यासाठी माझी काहीही हरकत नाही असे सांगितले. तसेच लोकसभेत सांगलीच्या जागेवरून झालेल्या गदारोळानंतर आज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना आणि सर्वांना जागावाटपवरून भांडण करू नका, कामात वज्रमूठ कामात दिसली पाहिजे. असे सांगत ज्या पक्षाला जी जागा सुटले त्यासाठी तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन काम करा असे सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, विरोधकांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतली आहे. काँग्रेसचा हात, सेनेची मशाल, आणि पवार साहेबांचा हातात तुतारी असलेला मावळा गावागावात पोहोचवा असे ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा पण जागा वाटपात भांडण करू नये, अशी आशाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img