मुंबई
बहिणीचं नातं आमच्या भावाला कळलंचं नाही. प्रेमात पैसे आले की ते नातं होतं नाही. प्रेमात आणि व्यवसायामध्ये माझ्या भावांनी गल्लत केली. बहिणीचं नातं हे 1500 रुपयात विकत घेता येत नाही. त्यांचं नातं फक्त मताशी जोडलेलं असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी महायुती सरकारवर (Mahayuti) केली आहे. महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) महामेळाव्यातून त्या बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी जाहीरपणे उद्धव ठाकरे, राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे मनःपूर्वक आभार मानते. लोकसभेला आपण आम्हाला जी काही मदत केली त्यामुळे आम्ही सगळे जे निवडून आलो आहोत. त्यात प्रत्येक पक्षाचे खूप मोठे योगदान आहे. आज जेव्हा पार्लमेंटमध्ये आम्ही बसतो तेव्हा सर्वात मोठा आवाज संसदेत महाविकास आघाडीकडून कोणाचा असतो तर तो वर्षाताई यांचा असतो. ही आमच्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की निवडणुकीनंतर जे दिलेत ते पैसे वापस घेण्याची ताकतही आमच्यात आहे असं काही लोक म्हणत आहेत असा घणाघाती आरोप सुप्रिया सुळे यांनी यावेळी केला आहे. तसंच, जर असं पैशात तुम्ही जरबहिणींच नात मोजणार असताल तर हे गलीच्छ राजकारण आहे. परंतु, तुम्ही कुणाचा एक रुपयाही वापस घेऊन बघा मग तुम्हाला मी सांगते असा इशाराही सुळे यांनी यावेळी दिला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की यावेळी त्यांनी मशाल आणि घड्याल याच्या न्यायालयीन लढाईवरही भाष्य केलं. जर तुम्ही ही लढाई चिन्हांची असेल असं समजत असाल तर तस अजिबाद नाही. ही तत्वांची हढाई आहे असं म्हणत आम्ही यातील निकाल लागेपर्यंत उद्धव ठाकरेंच्या सोबत असणार आहोत. आम्ही तुमच्यासोबत आहोत असा शब्दही सुप्रीया सुळे यांनी यावेळी सांगितंल. तसंच,ही दडपशाही आम्ही चालू देणार नाही. हा देश संविधानाने चालतो आणि चालणार असंही त्या यावेळी म्हणाल्या.