नाशिक
बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या (Nashik Hindu Morcha) अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून (Sakal Hindu Samaj Rally) नाशिक बंदची (Nashik) हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी दोन गटात वाद झाल्याची माहिती समोर आली. पण पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आलं आहे.
नाशिकच्या भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात आज नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. सकल हिंदू समाजाकडून बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. सकल हिंदू समाजाच्या आवाहनाला अनेक व्यापाऱ्यांनी आणि दुकानदारांनी सकारात्मक प्रतिसाद देत दुकानं बंद ठेवली होती. पण नाशिकच्या भद्रकाली परिसरात काही दुकानं सुरु होती. सकल हिंदू समाजाची रॅली आज दुपारी भद्रकाली परिसरात पोहोचली. यावेळी आंदोलकांनी दुकानदारांना दुकान बंद करण्याचं आवाहन केलं. पण काही दुकानदारांनी त्यास विरोध केला. त्यामुळे नाशिकच्या भद्रकाली परिसरात दोन गटात वाद निर्माण झाला. भद्रकाली परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे यशस्वी प्रयत्न केले.