21 C
New York

Pravin Darekar : प्रवीण दरेकरांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, म्हणाले…

Published:

मुंबई

उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) निवडणुकीसाठी आव्हानाची भाषा केली आहे. कोण राहणार आणि कोण जाणार हे महाराष्ट्रातील जनता ठरवणार आहे. निवडणुकी (Election) पर्यंत वाट बघूया. निकालानंतर कोण राहिले आणि कोण गेले हे स्पष्ट होईल. मोदींना घालवण्यासाठी देश एकवटला होता, सारे पक्ष एकवटले होते, सगळ्या प्रवृत्ती एकवटल्या होत्या परंतु मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. त्यांना घालवणारेच गेले, असा टोला भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.

दरेकर म्हणाले की, उद्धव ठाकरेंना आता माहित आहे त्यांच्यात एकमताने मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देऊ शकत नाहीत. काँग्रेसमध्ये ४-४ उमेदवार आहेत. पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, विजय वडेट्टीवार इच्छुक आहेत. शिवाय तरुण नेतृत्व बंटी पाटील, विश्वजीत कदम आहेत. त्यामुळे ६-७ नावांपैकी एकाचे नाव कोण आणि कसे जाहीर करणार. राष्ट्रवादीत सुप्रिया सुळे, जयंत पाटीलसह अनेक इच्छुक आहेत. एक नाव येणार नाही याची उद्धव ठाकरेंना कल्पना आहे. त्यामुळे असे वक्तव्य त्यांनी केले आहे. परंतु महाविकास आघाडी एकत्रितपणे एक नाव देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे.

दरेकर म्हणाले की, सकल हिंदू समाजाने बांगलादेश मधील हिंदू समाजावर अत्याचार होतोय त्याबाबत भावना व्यक्त करण्यासाठी मोर्चा काढला होता. तथापी तीच बांगलादेशी पिलावळ याही ठिकाणी वळवळताना दिसली आणि त्यातूनच संघर्ष झाला, तणाव झाला. तणावाचे कारण रामगिरी महाराजांचे वादग्रस्त वक्तव्य असू शकते, व्यक्तिशा त्यांचे मत असू शकते. परंतु तेथील हिंदूंवर अन्याय होतोय हे पाहिलेय, ऐकलेय आणि वस्तुस्थिती आहे. तेथील होणाऱ्या अन्यायाबाबतीत दुमत असायचे कारण नाही. इथे राहून अशा प्रकारची मनोवृत्ती बाळगून येथील हिंदूंना विरोध करणार असाल तर ते योग्य ठरणार नाही. सरकारने गांभीर्याने दखल घेऊन हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

दरेकर म्हणाले की, इम्तियाज जलील खासदारकीला पडलेले आहेत. विधानसभा लढवायची असेल तर दंगल झाली, दंगलसदृश्य वातावरण झाले तर संभाजीनगरमध्ये आपला टिकाव लागेल त्यातून आलेले त्यांचे वक्तव्य आहे. कुठल्याही सरकारला दंगली व्हाव्यात असे वाटत नाही. शांतता असावी वाटते. त्याचप्रमाणे महायुती सरकारची भुमिका असल्याचे दरेकर म्हणाले.

दरेकर म्हणाले की, कुठल्याही सरकारची योजना असेल त्या योजनेच्या प्रचार आणि प्रसारासाठी खर्च करत असतो. माहिती व जनसंपर्क खर्च करत असते. ते कशासाठी खर्च केले याचाही हिशोब दिला जात असतो. त्यात काही गैरव्यवहार वाटला तर बोलू शकतात. परंतु योजना कार्यान्वित करण्यासाठी प्रत्येक योजनेवर सरकार खर्च करत असते त्याच पद्धतीचा खर्च आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img