8.5 C
New York

Lamine Yamal : स्पेन फुटबॉलरच्या वडिलांवर टोळीने केला हल्ला

Published:

निर्भयसिंह राणे

स्पेनचा युवा फुटबॉल स्टार लामीन यामालचे (Lamine Yamal) वडील, मौनीर नासराओई यांना गुरुवारी, 15 ऑगस्ट रोजी कॅटलोनियाच्या मातारो येथे पार्किंग लॉटमध्ये पुरुषांच्या एका टोळीने चाकूचे वार केले. स्पॅनिश वृत्तपत्र ला वॅनगार्डीयनच्या वृत्तानुसार, मौनीर नासराओई आपल्या कुत्र्यासोबत बाहेर फिरत असताना पुरुषांच्या एक गटाशी त्यांचा जोरदार वाद झाला, जो नंतर अधिकृत सूत्राच्या अहवालानुसार मौनीरवर हल्ला करण्यासाठी ते परत आले.

लामीन यामालच्या वडिलांना या हल्ल्यात अनेक जखमा झाल्या आणि त्यांना तत्काळ कॅन रुती रुग्णालयात वैधयकीय उपचारांसाठी दाखल करण्यात आले. अनेक चकुच्या जखमा असूनही, मौनीर नासराओईची प्रकृती स्थिर झाली आणि ते धोक्याबाहेर असल्याचा अहवाल स्पॅनिश वृत्तपत्राने जाहीर केला. ही घटना गुरुवारी 19:10 EMT वाजता रोकाफोंडा परिसरात घडली, जिथे यमाल मोठा झाला. मौनीर नासराओई वरील हल्ल्याने स्थानिक रहिवाशांना तसेच यमालच्या कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.

Vinesh Phogat Verdict : विनेशच्या याचिकेवरील निर्णयाची तारीख पुन्हा बदलली…

स्पॅनिश पोलिसांनी लामीन यामालच्या वडिलांनवर हल्ला करणाऱ्या चार संशयितांना अटक केली आहे. सर्वे संशयित सध्या मातारो पोलिस ठण्यात चौकीसाठी पोलिस कोठडीत आहे. स्पॅनिश पोलिस या घटनेची सखोल चौकशी करत आहेत आणि या घटनेबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी पीडित नासराओईची मुलाखत देखील घेतली. हल्ल्यानंतर, मौनीर नासराओईने सोशल मीडियावर पोस्ट करत सर्व चाहत्यांचे या कठीण काळात प्रोत्साहन दिल्याबद्दल आभार व्यक्त केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img