मुंबई
आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) अनुषंगाने राज्यातील पक्षांनी मोठी तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आपापल्या मतदारसंघात सभा, दौरे सुरू आहेत अशातच मोठी बातमी समोर आली आहे. वंचित बहुजन (Vanchit Bahujan Aaghadi) आघाडीला निवडणूक आयोगाने चिन्ह दिलं आहे. महाराष्ट्र विधानसभेसाठी वंचित बहुजन आघाडी हे गॅस सिलेंडर (Gas cylinder) या नव्या चिन्हाने मैदानात उतरणार आहेत. निवडणूक आयोगाने (Election Commission) विधानसभा निवडणुकीसाठी वंचितला गॅस सिलेंडर दिले आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी राजकीय पक्षांनी जोरात सुरू केली आहे. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडी हा पक्ष सुद्धा मागे नाही. अशातच दिनांक 14 ऑगस्ट रोजी भारतीय निवडणुक आयोग सचिवालयाकडून एक पत्र जारी करण्यात आले. त्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात ‘गॅस सिलेंडर’ चिन्ह दिल्याचे घोषित केले आहे.
25 जुलै ते 7 ऑगस्ट या काळात वंचित बहुजन आघाडीने आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण राज्यात दौरा केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने जोरदार तयारी केल्याचे दिसले. यातच राज्यातील संपूर्ण विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह निवडणूक आयोगाकडून मिळाल्याने वंचित बहुजन आघाडीसाठी ही खूप चांगली संधी मानली जात आहे.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत लढवलेल्या सर्वच मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने ‘गॅस सिलेंडर’ या चिन्हावर निवडणूक लढवली होती. विधासभा निवडणुकांत काही ठिकाणी कपबशी, तर काही ठिकाणी गॅस सिलेंडर अशा वेगवेगळ्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला राज्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात गॅस सिलेंडर चिन्ह मिळाले आहे.