3.6 C
New York

Ashish Shelar : मुख्‍यमंत्रीपदावरुन शेलारांची उद्धव ठाकरेंवर टीका, म्हणाले…

Published:

मुंबई

आमचाच मुख्‍यमंत्री.. शपथ कार्यक्रमाला या.. अशा वल्‍गना करणा-या उबाठा गटाचे तारे जमी पर आ गये, असे आजच्‍या महाविकास आघाडीच्‍या मेळाव्‍यातील चित्र समोर आले आहेत. तसेच ज्‍याचे आमदार जास्‍त त्‍यांना मुख्‍यमंत्रीपद (Maharashtra CM) हा महायुतीचा फॉम्‍युला होता, हे सत्‍य ही आज उध्‍दव ठाकरे (Uddhav Tthackeray) बोलून गेले. म्‍हणजे त्‍यावेळी ते मुख्‍यमंतत्रीपद मागत होते ते कपोलकल्पित होते अशी प्रतिक्रिया मुंबई भाजपा अध्‍यक्ष आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी दिली आहे.

आशिष शेलार म्‍हणाले की, मुख्‍यमंत्रीपदावरुन उध्‍दव ठाकरे यांनी आज जे विवेचन केले त्‍यावरुन उबाठाचे तारे जमी पर आगये असे चित्र आहे. आमचाच महाराष्‍ट्रात चेहरा, मुख्‍यमंत्री पदी पुन्‍हा उध्‍दव ठाकरेच अशा वल्‍गना उबाठाकडून करण्यात येत होत्‍या. त्‍यासाठी त्‍यांनी दिल्ली जाऊन आले तरी मागणी मान्‍य होत नाही. सिल्व्हर ओकला बैठका झाल्‍या तरीही मागणी मान्‍य झाली नाही त्‍यामुळे त्‍यांनी आज हे विधान केले. त्‍यांच्‍यातली धुसमूस बाहेर येत असून ही लाथाबुक्यांपर्यंत जाऊ नये, अशी टीपणी आमदार अॅड आशिष शेलार यांनी केली.

आशिष शेलार म्‍हणाले की, कोरोना काळात ज्‍यांनी भ्रष्‍टाचार केले, पदविधरांचे भविष्‍य विस्‍कटले, त्‍यांच्‍या मुख्‍यमंत्री काळात माता भ‍गि‍नींवर अन्‍यायाचे पहाड कोसळावे अशी परिस्‍थि‍ती निर्माण केली, रोजगार निर्मितीचे, आर्थि‍क गुंतवणुकीचे प्रस्‍ताव आले जे महाराष्‍ट्राच्‍या हिताचे होते त्‍याला विरोध केला. संपादकांना अटक, बोलू द्यायचे नाही, लोकशाहीला धोक्यात आणले. ज्‍यांनी महाराष्‍ट्रातील प्रकल्‍प रोखले, महाराष्‍ट्राला बदनाम केले त्‍या महाविकास आघाडीला, त्‍या महाराष्‍ट्र द्रोह्यांना तडीपार करणे, हद्दपार करणे, हाच आमचा कार्यक्रम आहे, असेही त्‍यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img