-2.7 C
New York

PM Narendra Modi : विकसित भारताचे स्वप्न नक्कीच पूर्ण होणार, मोदींनी व्यक्त केला विश्वास

Published:

आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, देशातील नागरिकांसाठी आम्ही दीड हजारांपेक्षा जास्त कायदे रद्द केले. यामुळे लोकांचे जीवन अधिक सुसह्य झाले. किरकोळ गोष्टींसाठी सुद्धा कारावासाची शिक्षा असणारे कायदे रद्द करण्यात आले. अपराधिक कायदे बदलण्यात आले.

आता मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या इज ऑफ लिविंग मिशनमध्ये सहभागी व्हावे. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही शिफारसी मागितल्या आहेत. काही लोकांनी भारताला कौशल्य राजधानी बनविण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी देश आत्मनिर्भर व्हावा यावर भर दिला. शासन आणि न्याय प्रणालीत सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांचे निर्माण, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन अशा अनेक आशा भारतीय नागरिकांच्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

PM Narendra Modi दहा वर्षांत रस्ते अन् रुग्णालयांचे जाळे

मागील दहा वर्षांच्या काळात देशात रस्ते, रेल्वे, महामार्ग, स्कूल कॉलेज, रुग्णालये, मेडिकल कॉलेज, अमृत सरोवर, दोन लाख ग्रामपंचायतीत ऑप्टिकल फायबर, चार कोटी पक्की घरे अशा सुविधा निर्माण करण्यात आल्या.

PM Narendra Modi मेडिकलच्या 75 हजार जागा आणखी वाढणार

वैद्यकिय शिक्षणासाठी देशातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या देशात जावे लागत आहे. दहा वर्षांच्या काळात मेडिकल जागांची संख्या एक लाख झाली आहे. आगामी पाच वर्षांच्या काळात देशातील वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येतील.

PM Narendra Modi देशाला कम्यूनल नाही सेक्यूलर सिव्हिल कोडची गरज

सर्वोच्च न्यायालयाने अनेकदा युनिफॉर्म सिव्हिल कोडबाबत चर्चा केली आहे. देशातील बहुतांश नागरिकांना वाटतं की सिव्हिल कोड सांप्रदायिक आहे. यात सत्यता आहे. संविधान निर्मात्यांचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याची आमची जबाबदारी आहे. देशातील प्रत्येक घटकाने यावर चर्चा करण्याची गरज आहे. धर्माच्या आधारावर गट तयार करणारे कायद्यांचे समाजात स्थान नाही. आता देशात सेक्यूलर सिव्हिल कोडची गरज आहे. कम्यूनल सिव्हिल कोडमध्ये 75 वर्षे निघून गेली आहे. आता आपल्याला सेक्यूलर सिव्हिल कोडकडे मार्गक्रमण करावे लागणार आहे.

PM Narendra Modi देशाच्या संरक्षणासह अंतराळातही महिलांचा दबदबा

महिला आधारीत विकासाच्या मॉडेलवर काम करण्यात आले आहे. इनोवेशन पासून प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे येत आहेत. महिला फक्त सहभागीच होत नाहीत तर नेतृत्वही करत आहेत. सेना, नौसेना आणि स्पेस क्षेत्रात महिलांनी स्वतःला सिद्ध केले आहे. सरकारने महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत.

PM Narendra Modi रिसर्च इनोवेशनसाठी एक कोटींची तरतूद

आता विज्ञान तंत्रज्ञानावर भर देण्याची गरज आहे. चांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेनंतर विद्यार्थी या क्षेत्राकडे आकर्षित होत आहेत. आता या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यासाठी संस्थांनी पुढे येण्याची गरज आहे. रिसर्चसाठी सरकारने आणखी मदत करण्याचा निश्चय केला आहे. नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखी व्यवस्था तयार केली आहे. यासाठी बजेटमध्ये एक कोटी रुपये रिसर्च अँड इनोवेशनसाठी दिले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img