21 C
New York

PM Narendra Modi : सेक्यूलर कोड अन् भ्रष्टाचारावर प्रहार.. वाचा, मोदींच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे

Published:

आज देशभरात स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात (Indenpendence Day) साजरा केला जात आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशवासियांना संबोधित केले. मोदी म्हणाले, देशातील नागरिकांसाठी आम्ही दीड हजारांपेक्षा जास्त कायदे रद्द केले. यामुळे लोकांचे जीवन अधिक सुसह्य झाल्याचा दावा मोदींनी केला. तसेच वन नेशन वन इलेक्शन, युनिफॉर्म सिव्हिल कोडसारख्या संवेदनशील मुद्द्यांनाही हात घातला.

आता मी सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आवाहन करतो की त्यांनी आमच्या इज ऑफ लिविंग मिशनमध्ये सहभागी व्हावे. सन 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनविण्यासाठी आम्ही शिफारसी मागितल्या आहेत. काही लोकांनी भारताला कौशल्य राजधानी बनविण्याची सूचना केली आहे. काही लोकांनी देश आत्मनिर्भर व्हावा यावर भर दिला. शासन आणि न्याय प्रणालीत सुधारणा, ग्रीनफिल्ड शहरांचे निर्माण, भारताचे स्वतःचे स्पेस स्टेशन अशा अनेक आशा भारतीय नागरिकांच्या आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

… तर 27 लाख लाडक्या बहिणींना मिळणार नाही पैसे, ‘हे’ आहे कारण

PM Narendra Modi पीएम मोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • घराणेशाही आणि जातीवादाच्या राजकारणामुळे देशाच्या लोकशाहीलाच धोका निर्माण झाला आहे. यावर मात करण्यासाठी राजकीय पार्श्वभूमी नसणारे किमान एक लाख लोक पुढे आणणार.
  • देशाला आता वन नेशन वन इलेक्शनसाठी पुढे यावे लागणार आहे. मी सर्व राजकीय पक्षांना विनंती करतो की या कामी पुढाकार घ्या.
  • आता देशात सेक्यूलर सिव्हिल कोडची गरज आहे. कम्यूनल सिव्हिल कोडमध्ये 75 वर्षे निघून गेली आहे. आता आपल्याला सेक्यूलर सिव्हिल कोडकडे जावे लागेल.
  • बांग्लादेशात जे काही घडलंय ते पाहून शेजारी देश म्हणून दुःख होणं सहाजिक आहे. बांग्लादेशातील अल्पसंख्यक हिंदू धर्मियांचे संरक्षण व्हावे अशी भारतीयांची अपेक्षा आहे.
  • आमचं स्वप्न आहे की 2036 मध्ये ऑलम्पक स्पर्धा भारतात व्हाव्यात. यासाठी तयारीस सुरूवात करण्यात आली आहे.
  • नॅशनल रिसर्च फाउंडेशन सारखी व्यवस्था तयार केली आहे. बजेटमध्ये एक कोटी रुपये रिसर्च अँड इनोवेशनसाठी दिले आहेत.
  • कोणत्याही परिस्थिती आमची भ्रष्टाचाराविरोधातील लढाई सुरूच राहणार आहे. भ्रष्टाचाऱ्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार आहे.
  • दहा वर्षांच्या काळात मेडिकल जागांची संख्या एक लाख झाली आहे. आगामी पाच वर्षांच्या काळात देशातील वैद्यकिय महाविद्यालयांत आणखी 75 हजार नवीन जागा उपलब्ध करून देण्यात येतील.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img