23.1 C
New York

Jayant Patil : मराठा आंदोलकांचा जयंत पाटलांना घेराव, निवेदन दिलं अन्…

Published:

मराठा आरक्षण आंदोलन राज्यात पुन्हा (Maratha Reservation) आक्रमक होताना दिसत आहे. मराठा आंदोलक ज्या प्रमाणे सत्ताधाऱ्यांना जाब विचारत होते तसाच प्रकार आता विरोधकांच्या बाबतीतही घडू लागला आहे. काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलकांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे वाहन अडवून त्यांना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती. तसाच प्रकार आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याबाबतीत घडला. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने जयंत पाटील लातूर दौऱ्यावर (Latur News) आहेत. यावेळी ध्वजारोहण करण्यासाठी जात असताना मराठा आंदोलकांनी आक्रमक होत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणा दिल्या.

स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2024) आज लातूरमधील जय क्रांती महाविद्यालयात ध्वजारोहणासाठी जयंत पाटील निघाले होते. यावेळी मराठा आंदोलकांनी त्यांना अडवलं. निवेदन दिलं आणि मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली. परंतु, यावर लगेच काही भाष्य करण्याचं जयंत पाटलांनी टाळलं. त्यामुळे आंदोलक आक्रमक झाले आणि त्यांनी जयंत पाटील यांच्या विरोधात घोषणा देण्यास सुरुवात केली.

सेक्यूलर कोड अन् भ्रष्टाचारावर प्रहार.. वाचा, मोदींच्या भाषणातील १० महत्वाचे मुद्दे

यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत मराठा समाजबांधवांना वेगळं केलं. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar) पक्षाची शिवस्वराज्य यात्रा आता लातूर जिल्ह्यात दाखल झाली आहे. यात्रा जिल्ह्यात आल्यापासून मराठा आरक्षणाबाबत समाजबांधवांनी अनेक वेळा आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. लातूर, निलंगा आणि अहमदपूर या ठिकाणी खासदार सुप्रिया सुळे यांनाही निवेदन देण्यात आलं होतं. तरीदेखील पक्षाच्या वतीने अद्याप ठोस भूमिका जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजबांधवांत नाराजीची भावना आहे.

या मुद्द्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने लवकरात लवकर भूमिका जाहीर करावी अशी मागणी समाजबांधवांकडून केली जात आहे. इतकेच नाही तर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनीही शरद पवार यांनी आरक्षणाबाबत स्पष्ट भूमिका मांडावी (Maratha Reservation) अशी मागणी लावून धरली होती. मात्र तरी देखील शरद पवार यांच्या पक्षाकडून अद्याप ठोस भूमिका जाहीर झालेली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img