3 C
New York

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चा मोठा डाव; विधानसभा निवडणूक ‘या’ नेत्याच्या नेतृत्वाखाली

Published:

मुंबई

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील विधानसभेची मुदत 23 नोव्हेंबर रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी राज्यात विधानसभा निवडणुका (Assembly Elections) लागणार आहेत. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांमध्ये हालचाली वेगाने सुरु झाल्या आहेत. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) निवडणूक रणनीतीसाठी चांगलीच आघाडी घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने बैठकांचा सपाटा लावला आहे. महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी मतदारसंघाची चाचपणी देखील सुरु केली आहे. याचदरम्यान, महाविकास आघाडीच्या निवडणुकीच्या प्रचारप्रमुखपदाची जबाबदारी शिवसेना उबाठा नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखपदी उद्धव ठाकरेंची नियुक्ती केल्याने महायुतीचं (MahaYuti) टेन्शन वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या प्रचाराचे प्रमुखपदाची जबाबदारी उद्धव ठाकरे यांना दिली आहे. यामुळे उद्धव ठाकरे यांच्यात नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार आहे. पण मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आताच जाहीर होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण हे ठरवलं जाणार आहे.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे प्रचार प्रमुख असणार आहेत. काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी राज्यातील नेत्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. विधानसभा निवडणुकीची प्रचार यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात येणार आहेत. आगामी निवडणुकीत निघणाऱ्या रॅली, प्रचार सभांमध्येसुद्धा काँग्रेस नेते उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहेत. काँग्रेस नेत्यांना काँग्रेस हायकमांडकडून ही माहिती दिली गेल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाविकास आघाडीचे सरकार असताना ठाकरे यांच्या नेतृत्वाखालीच काँग्रेस नेत्यांनी काम केली होती. त्यामुळे आता प्रचार प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांची निवड केली आहे. परंतु यासंदर्भात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून सावध भूमिका घेतली गेली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? यासंदर्भात उत्सुक्ता आहे. परंतु उद्धव ठाकरे सध्या केवळ प्रचार प्रमुख असणार आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निश्चित करण्यात आलेला नाही. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्रीपदाचा चेहर निश्चित करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img