7.6 C
New York

Nawab Malik : नवाब मलिकांची अजित पवारांना साथ? एक्सवर पोस्ट करत दिले संकेत

Published:

मुंबई

राष्ट्रवादीमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी ते शरद पवार (Sharad Pawar) किंवा अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत असण्यासंबंधी आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. मात्र हिवाळी अधिवेशनात ते सत्ताधारी बाकावर बसले होते. म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहिताना म्हटले होते की, नवाब मलिक यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही. असे असले तरी नवाब मलिक हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच आहेत. त्यांनी स्वातंत्रदिनाच्या शुभेच्छा (Independence Day post) देताना ट्वीट केले आहे. त्यामुळे नवाब मलिक हे अजित पवारांसोबत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

नवाब मलिक यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर केली. आपणा सर्वाना स्वातंत्र्य दिनाच्या शभेच्छा अशा आशयाची पोस्ट त्यांनी शेअर केली. या पोस्टसोबत जोडलेल्या फोटोत नवाब मलिक, आमदार, अणूशक्ती नगर असा उल्लेख करतांना त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अधिकृत निवडणूक चिन्ह घड्याळ लावले आहे. मलिकांनी घड्याळ हे चिन्ह वारपल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, काल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करतांना शेअर केलेल्या पोस्टमध्येही मलिक यांनी घड्याळ वापरले होते.

मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने 23 फेब्रुवारी 2022 रोजी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक केली होती. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा आरोपही त्यांच्यावर होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मलिकांवर दाऊद इब्राहिमच्या साथीदाराकडून कमी किमतीत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप केला होता.

दरम्यान, मलिक हे जामीनावर सुटून आल्यानंतर फडणवीस यांनी अजित पवार यांना पत्र लिहून नवाब मलिक यांचा महायुतीत समावेश करणे योग्य होणार नाही, असे म्हटले होते. तेव्हापासून राष्ट्रवादीने मलिक यांना दूरच ठेवलं होतं. मात्र, मलिक यांनी आता स्वातंत्र्यदिनाच्या पोस्टमध्ये घड्याळाचे चिन्ह वापरलं. त्यामुळे ते अजित पवार यांच्या गटासोबत असल्याचे स्पष्ट झाले. मात्र. मलिक यांच्यावर आरोप करणारे देवेंद्र फडणवीस यांना मलिक यांचा महायुतीतील सहभाग चालणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img