‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमधील (Bigg Boss Marathi) सदस्य दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यांमुळे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते. ‘बिग बॉस मराठी’च्या (Bigg Boss Marathi ) नव्या सीझनमधील सदस्य दररोज कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. कधी भांडण, कधी टास्क, तर कधी एकत्र केलेली मजामस्ती यांमुळे बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य चर्चेत असल्याचे पाहायला मिळते.
(Bigg Boss Marathi New Season)आजच्या भागात सूरज चव्हाणला (Suraj Chavan) समजावण्याचा धनंजय पोवारचा (Dhananjay Powar) तिखर कोल्हापुरी अंदाज पाहायला मिळणार आहे. आजच्या भागात डीपी सूरजला समजावत म्हणतोय,”स्वत:वर कंट्रोल करता आलं पाहिजे. उद्या आमच्यात खेळताना समोर अरबाज, वैभव कोणीही असले तरी असं खेळू नको. सगळ्यांची काळजी घ्यायला पाहिजे. खेळात छान खेळलं पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे”.
‘तोंड बंंद कर तुझं!’ जेवणावरुन आर्याचा डीपीसोबत झाला कल्ला
सूरज घाबरेल, दुखावेल या काळजीने अभिजीत सावंत धनंजयला म्हणतो की, “नका बोलू.” त्यावर डीपी चिडतो आणि म्हणतो, “एवढं काय मी शिव्या देत नाहीए की जोड्याने हाणत नाही.” अभिजीत आणि पंढरीनाथ म्हणतात,” कळलंय त्याला.” धनंजय म्हणतो, “मग विषय तुम्हीच बंद करा. हा नवीन विषय काढणार. तुम्ही वेगळं बोलणार.” त्यानंतर अभिजीत त्याला म्हणतो, “किती रागवता तुम्ही.” वातावरण गरम होत असल्याचे लक्षात येताच तिथे बसलेली अंकिता सगळ्यांना ‘झालं झालं’ असं म्हणत शांत राहायला सांगते.
Bigg Boss Marathi सूरज सांगतोय त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल
निक्की आणि घन:श्यामला आजच्या भागात सूरज त्याला मिळालेल्या गोलीगत धोक्याबद्दल सांगणार आहे. त्यावर निक्की विचारते, “तुला कोणी बुक्कीत टेंगुळ तर दिलं नाही ना?”. सूरज म्हणतो, “माझ्यासोबत चांगली राहायची, बोलायची वगैरे… पण तिला दुसरा चांगला मुलगा मिळाला आणि तिने मला सोडलं. गोलीगत धोका दिल्याने मला खूप राग आला होता. त्यानंतर मी लोकांच्या मनावर राज्य केलं”.