आज भारताचा ७८ वा स्वातंत्र्यदिन (Independence Day) सगळीकडे जल्लोषात साजरा केला जातोय. प्रत्येकजण आपले फोटो-व्हिडिओ सोशल माध्यमांवर टाकत आपली देशभक्ती त्यांच्या- त्यांच्या पद्धतीने साजरी करत आहे. अशातच टायनी टॉकीजने (Tiny Talkies) एक उपरोधिक व्हिडिओ पोस्ट करत नागरिकांना विचार करायला भाग पाडणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे. दैनंदिन जीवनात आपल्याकडून होणाऱ्या चुका, जाणूनबुजून केलेला गुन्हा आपल्या नजरेत आणायचं काम या व्हिडिओने केले आहे असे म्हणायला हरकत नाही. लेखक अभिजित पवार, अभिनेता तेजस राऊत व सिनेमॅटोग्राफर सिद्धेश नलावडे यांनी आजच्या दिवशी असा व्हिडिओ लोकांसमोर आणायचे धाडस केले आहे.
प्रत्येकाने हा व्हिडिओ एकदा बघाच आणि आपणही त्यामध्ये येतो का असा विचार करायला हरकत नाही