16.7 C
New York

Palghar : जव्हार येथील २०० खाटांचे रुग्णालय ढिसाळ धोरणामुळे पूर्णत्वास विलंब

Published:

पालघर: पालघर (Palghar) जव्हार हा अतिदुर्गम तालुका. आधीच कुपोषणाचा शाप,त्यात बदल व्हावा यासाठी पालघर जिल्हा होऊन ८ वर्षे उलटली पण जव्हार तालुका आरोग्य व्यवस्थेपासुन खूप दुर आहे . कुपोषणाचं मुळ कारण हे जरी भुक असलं तरीही आज १०० खाटांचे रुग्णालय कुचकामी ठरत आहे आज १०० खाटा असुन १६० लोक इस्पितळात दाखल असतात .सन २०११ ला दिवंगत आमदार यांनी शासकीय पद मंजूर केली पण तो शासन निर्णय मात्र कागदावरच राहीला


या सगळ्या व्यवस्थे ला कंटाळुन जव्हार येथे २०० खाटांचे रुग्णालय मंजूर करण्यासाठी कॅप्टन विनित मुकणे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जव्हार साठी २०० खाटांचे रुग्णालय मागितले. रुग्णालय मंजुर देखील झाले, परंतु २०१९ ते आज तागायात रुग्णालय जागे अभावी लाल फीतीत आहे. जव्हार चे राजे यांनी २०१९ ला जागा देण्यासाठी पुढाकार घेतला. आणि जिल्हाअधिकारी यांना पत्राद्वारे प्रत्यक्ष कळविले देखील पण करारनामा २०२३ ला देताना जाचक अटी टाकल्या ज्या शासन मान्य करू शकत नाही .हे सगळं वाचल्यावर मन सुन्न झाल विनित यांनी स्वतः पुढाकार घेंवून शासनाची १३.८५ एकर शासकीय जमीन शोधली पण प्रशासन अद्यापही सुन्न आहे ही बाब अतिशय गंभीर आहे.

निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले जयेश्वर महादेव मंदिर


आज ९० कोटी निधी ३ वर्षापासून येऊन पडलाय पण प्रशासन कारण देण्यात मग्न आहे .७६ वर्ष स्वतंत्र होऊनही ही परिस्थिती असेल तर २०१९ ते २०२४ पर्यंत कित्येक निष्पाप बळी केवळ रुग्णालय अभावी मयत झाले हा लोकशाही मधे एक प्रकारचा सदोष मनुष्य अवधानाचा गुन्हा म्हणावा लागेल अनेक रुग्ण वाचले पाहिजे ही भावना आज प्रत्येक जव्हारकर व्यक्त करतो . पण आमच्या आदिवासी बांधवांच्या जीविताचे मोल आज ही शून्य आहे हे या सरकारी अनास्थेहून दिसून येत . आपण मूलभूत अधिकार देऊ शकत नसु तर प्रशासन कश्यासाठी काम करतंय हे कळण्याइतपत सुजाण नागरिक आपल्याकडे नाहीत का ?


स्वतंत्राची ७५ वर्षे साजरी करत असताना आपण खरोखर त्या ७५ वर्षे साजरी करण्यास पात्र आहोत का की प्रत्येक गोष्ट झगडून भांडुन आंदोलनातूनच मिळेल. लोकशाहीचा ४ था स्थंभ म्हणुन जाब विचारणार पण लोकप्रतिनिधी केंव्हा जागे होणार हा मोठा प्रश्न आहे आजतागायत वेळेवर उपचार न मिळाल्याने दगावलेल्यांची संख्या प्रचंड आहे याला जबाबदार कोण हा प्रश्न अधोरेखित आहे .

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img