3.7 C
New York

Palghar : निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले जयेश्वर महादेव मंदिर

Published:

संदीप साळवे,पालघर

पालघर: (Palghar) श्रावण मास म्हणजे व्रतवैकल्यांचा महिना, पवित्र अशा या महिन्यात उपवास – तापास करून भक्ती भावाने अखंड सृष्टीचा निर्माता भगवान शंकराची मोठ्या आस्थेने आराधना केली जाते, जव्हार तालुक्यातील भाविकांना संस्थान कालीन पुरातन परंतु अश्या स्वयंभू जयेश्वर शिव मंदिरात भाविकांना दर्शनाची ओढ लागते, निसर्गरम्य अशा वातावरणात वसलेले हे शिव मंदिर भाविकांचे श्रद्धास्थान आहे.


जव्हारपासून डहाणू रोडवर ८ किमी. अंतरावर बाळकापरा येथे ‘जयेश्वर मंदिर आहे. घाटातील नागमोडी वळणं व घनदाट जंगलातून होणारा हा प्रवास आल्हाददायक वाटतो. विशेष म्हणजे, इसवी सन १९४५ ते १९५० दरम्यान यशवंतराव मुकणे महाराज यांची बहीण राजकन्या चांगुनाबाई नंदकर यांचे स्वप्नात नंदाची माळी येथे नंदी व पिंड दिसली असता, तत्कालीन संस्थानिकाने विहिरीजवळ असलेल्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराची स्थापना केली. त्यावेळी हे मंदिर हे लाकडापासून झोपडीसारखे बनविण्यात आले होते. या मंदिराची देखभाल करण्याकरिता, पायी भ्रमण करीत बोरकर बाबा नावाचे गृहस्थ दाखल झाले होते, ते भिक्षा मागून गुजराण करीत होते, मंदिरात भाविक आल्यानंतर बोरकर बाबांना धान्य देत असत.

मनोज जरांगे यांचा पहिला उमेदवार ठरला?


९७ वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना करताना दगडी शिवलिंग, पणती आणि नंदी हे स्वयंभू असल्याची अख्यायिका आहे, परंतु भाविकांना दर्शनासाठी मुख्य रस्त्यापासून हे ठिकाण दूर पडत असल्याने, सन १९६५ मध्ये कसाऱ्याचे व्यापारी बागेसर प्रसाद यांनी मंदिर उभारण्यासाठी देणगी दिली. मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यावर बाळकापरा येथील शिक्षक, बोरकर बाबा व इतर तीन ग्रामस्थांच्या साहाय्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या जयेश्वर मंदिराची विधिवत स्थापना केली.


मात्र, जुन्या जयेश्वर मंदिराचा जीर्णोद्वार श्रीमंत यशवंतरावांची बहीण चांगुणाबाई नंदकरांची मुलगी चंचला देशमुख यांनी अतिशय कल्पक व अप्रतिम केला आहे. त्याचप्रमाणे शासनाच्या वतीने तेथे एक प्रशस्त हॉलही बांधण्यात आला असून त्याचा उपयोग मंगलकार्यासाठी केला जातो. या वास्तूचे सुशोभीकरण व बारमाही विहिरीतील पाण्याचा साठा यामुळे परिसराच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. श्रावणात प्रत्येक शनिवारी व सोमवारी भाविक पायी प्रवास करीत दर्शन घेत असतात. बळवंत गावित यांच्या नेतृत्वाखाली येथे दर्शनासाठी आलेले पंचक्रोशीतील सर्व शिवभक्त यांचे नियोजन व व्यवस्थापन उत्तम असते.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img