8.7 C
New York

Assembly Elections : ‘मविआ’चं ठरलं, विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटणार!

Published:

मुंबई

महाविकास आघाडीचा विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) प्रचाराचा नारळ उद्या 16 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मेळाव्यातून फुटणार आहे. उद्या सकाळी 10.30 वाजता षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडणार आहे. उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील राज्यातील सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. महाविकास आघाडीतील प्रमुख नेते विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांना या मेळाव्यात मार्गदर्शन करतील आणि विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दृष्टिकोनातून रणनीती ठरवली जाईल. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचा हा पहिलाच संयुक्त मेळावा पार पडणार आहे.

विधानसभा निवडणुकीत मविआच्या प्रचाराची जबाबदारी उद्धव ठाकरेंवर देण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. प्रचाराचा प्रमुख चेहरा हा उद्धव ठाकरेच असतील. काँग्रेस हायकमांडनेही त्याला हिरवा कंदील दाखवला आहे. मात्र असं असलं तरी ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नसतील असे स्पष्ट करण्यात आले आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण याचा निर्णय घेतला जाईल असं काँग्रेसच्या सुत्रांचे म्हणणे आहे. दरम्यान उद्धव ठाकरे हेच मविआचे प्रचाराचे प्रमुख असतील याबाबत पक्षश्रेष्ठींनी राज्यातल्या काँग्रेस नेत्यांनी कळवले आहे. शिवाय तशा सुचनाही दिल्या आहेत. त्याच बरोबर लहान पक्षांनाही महाविकास आघाडीत घ्या असे सांगण्यात आले आहे. 

उद्धव ठाकरे यांनी नुकताच दिल्ली दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, मल्लिकार्जून खरगे यांच्याही भेटी घेतल्या. त्यातून मविआचा महाराष्ट्रातील चेहरा उद्धव ठाकरे असावेत हा संदेश दिला गेला. शिवाय तशी मोर्चा बांधणीही शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आली. लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांचा फायदा थेट काँग्रेसला झाला होता हे नाकारून चालणार नाही. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लढली जावी याला काँग्रेसनेही हिरवा झेंडा दाखवला आहे. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img