3.6 C
New York

Ajit Pawar : महायुतीच्या मुख्यमंत्रीपदावर अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; हे होणार मुख्यमंत्री

Published:

मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहेत. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आज पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. आज त्यांची जनसन्मान यात्रा पुण्यात आहे. यावेळी त्यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारे वक्तव्य केले. आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचा पारंपरिक मतदारसंघ बारामती येथून निवडणूक लढण्यात रस नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या पुस्तक प्रकाशनात त्यांनी मुख्यमंत्रीपदाबद्दल केलेल्या वक्तव्याचा पुन्हा एकदा उल्लेख केला आहे. त्यासोबतच आगामी विधानसभा निवडणुकी (Vidhansabha Election) महायुतीला (mahayuti) यश मिळाले तर मुख्यमंत्री कोण होणार याचाही खुलासा अजित पवारांनी केला आहे.

अजित पवार यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत अजित पवार यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. दरम्यान, शरद पवारांसोबत पुन्हा जाणार का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी ‘नो कमेंट’ असं उत्तर दिलं. तो राजकीय कार्यक्रम नव्हता. पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम होता. राज्यात अनेक नेत्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस हे दोघेही मला कनिष्ठ असलेले नेते मात्र दोघेही मुख्यमंत्री झाले.

अजित पवार म्हणाले, नो कॉमेंट्स मी आता महायुतीचा प्रचार करत आहे. मी बजेटमध्ये चांगल्या योजना आणल्या आहेत. त्याबाबत आम्ही लोकांना सांगत आहोत. आम्ही विकास करत आहोत. आम्ही आतापर्यंत काय काय काम केलं, कोणत्या मतदारसंघात काय केलं, याची माहिती लोकांना देत आहोत. लोकसभा निडणुकीत आमच्याकडून जे काही बाकी राहिलं. त्यामुळं मतदार आमच्यासोबत आला नाही. त्यांना समजावत आहोत, असं अजित पवार म्हणाले.

संविधानाबाबत फेक नॅरेटीव्ह समोर आणण्यात आलं होतं. त्याचा फटका बसला. चारशे पारचा नारा दिल्यानं हे संविधान बदलणार असं सांगितल्या गेलं. पण, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत या घटनेला हात लावला जाणार नाही.

यावेळी अजित पवार यांना सुनेत्रा पवार यांना बारामतीची निवडणूक लढवण्यास सांगणं ही चुक होती, या वक्तव्याबाबत विचारलं असता ते म्हणाले, माझ्या मनात जे येतं, ते मी बोलतो. मी 35 वर्षांपासून राजकारणात आहे. मला कुणीतरी विचारलं. मी निवडणुकीनंतर खूप विचार केला. हे कसं घडले? का घडलं? त्याला मीच जबाबदार आहे. मी कोणाला दोष देत नाही. मी हे करायला नको होते, म्हणूनच मी बोललो, असे अजित पवार म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img