निर्भयसिंह राणे
विकी कौशल (Vicky Kaushal) हा त्याच्या अष्टपैलू अभिनयासाठी जाणला जातो. अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. उरी, मासान, सॅम बहादूर, मनमर्जीयां इत्यादि सर्व चित्रपटांमध्ये त्याचा अष्टपैलू अभिनय पाहायला मिळाला. मात्र नुकत्याच रीलीज झालेल्या ‘बॅड न्यूज’ या चित्रपटात आपल्या विनोदी भूमिकेने विकीने सिने-चाहत्यांची मने जिंकली. या चित्रपटातील ‘तौबा-तौबा’ हे गाणेही प्रेक्षकांमध्ये चांगलेच व्हायरल झाले होते. विकीने नुकत्याच झालेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की ‘तौबा-तौबा’ हे गाणं पाहिल्यानंतर सॅम माणेकशॉच्या मुलीने त्याला मेसेज केला होता.
अलीकडेच बॉलीवुड हंगामाल दिलेल्या एक मुलाखतीत विकीने सांगितले की, “सैन्य अधिकार्याचे पत्र साकारणे आणि लष्कराने लेजेंड मानल्या जाणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याचे पत्र साकारणे यात बराच फरक आहे आणि ही एक खूप मोठी जबाबदारी होती. “1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान सॅम माणेकशॉ पंजाबमध्ये होते तेव्हापासून विकी त्याच्या आई वडिलांकडून सॅम माणेकशॉ यांच्या वीरगाथा ऐकत होते. याच मुलाखतीत विकीने या वीरगाथेची आठवण सांगितली.
Bigg Boss Marathi : ‘या’ सदस्यांवर नॉमिनेशनची टांगती तलवार; कोण जाणार घराबाहेर?
विकीने सॅम माणेकशॉ यांची मुलगी माया सोबतचा एक मनोरंजक किस्सा सुद्धा शेअर केले. “एक दिवस मायने ‘तौबा तौबा’ पाहिल्यानंतर मला मेसेज केला. तिने विचारले, ‘हा माणूस कोण आहे?’ आणि मी गोंधळून गेलो आणि म्हणालो, ‘पाच महिन्यांपूर्वी तू मला विश्वास दिला होता की तूच माझे वडील आहेस, म्हणजे माझे हे काम आहे’, विकीने मायाल रीप्लाय केले. नंतर विकीने असं सांगितलं की मायाने दिलेली ही टिप्पणी त्याच्यासाठी ही सर्वात मोठी प्रशंसा होती.