23.1 C
New York

Eknath Shinde : पुन्हा राजकीय भूकंप; काँग्रेसचे ‘हे’ आमदार शिंदे गटाच्या संपर्कात

Published:

मुंबई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections) पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाने तयारी सुरू केली आहे. महायुती (MahaYuti) कडून राज्यात मेळाव्याच्या माध्यमातून राज्य सरकारने केलेल्या काम जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहे. तर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने देखील विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारचा चुकीचे धोरण जनतेसमोर मांडत आहे. मात्र महाराष्ट्र काँग्रेसला (Congress) मोठा धक्का महायुतीकडून मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे दोन विद्यमान आमदार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

काँग्रेसचे आमदार हिरमण खोसकर आणि जितेश अंतापुरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेट घेतली आहे त्यामुळे काँग्रेसचे हे दोन आमदार पक्षाला रामराव ढोकण्याची तयारीत असल्याचं बोललं जात आहे. नुकतेच पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या काही आमदारांचे मत फुटली होते. काँग्रेसने त्या आमदारांना संदर्भात तयार केलेल्या अहवालामध्ये खोसकर आणि अंतापूरकर या दोन्ही आमदारांचे नावाचा समावेश असल्याचे देखील बोलले जात आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून तिकीट न मिळण्याची शक्यता नसल्याने शिंदे गटात प्रवेश करून विधानसभा निवडणूक लढवण्यात येते तयारी या दोन्ही आमदारांकडून करण्यात येत असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार उभा केला नसता तर ही निवडणूक बिनविरोध झाली असती. पण तिसऱ्या उमेदवारामुळे झालेल्या निवडणुकीत काँग्रेसची मतं फुटली. महाविकास आघाडीची मते फुटल्याचा फायदा भाजप आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला झाला. अजित पवार गटाची मते फोडण्याची शरद पवार गटाची रणतीनी यशस्वी झाली नाही.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img