8.3 C
New York

Sanjay Raut : महाराष्ट्रात दोन नेते भाजपचे हस्तक, एक राज ठाकरे तर दुसरे…; संजय राऊतांचा घणाघात

Published:

अकोला

महाराष्ट्रात दोन नेते हस्तक (BJP) आहेत, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकरांवर (Prakash Ambedkar) निशाणा साधला आहे. ते अकोल्यात (Akola) माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी महायुतीवरही (MahaYuti) जोरदार टीका केली.

संजय राऊत म्हणाले की, आपल्या भूमिकेमुळे राष्ट्रद्रोही शक्तींना, धर्मांध शक्तींना जर मदत होत असेल, मग ते कोणीही असो. या महाराष्ट्रात दोन असे नेते आहेत, जे अशाप्रकारे हस्तकाचे काम करतात. कधी मोदी-शाहांना पाठिंबा देतात, कधी बेईमान शिंदे गटाला पाठिंबा देतात, हे दोन महाराष्ट्रातील जे नेते आहेत. त्यांच्यावर आता महाराष्ट्राला विचार करण्याची वेळ आली. लोकसभेत यांचं कोणी ऐकलं नाही. पाडापाडी करणं आणि त्या बदल्यात व्यवहार करणं हे यांचं काम आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या धर्मांध शक्तींना धडा शिकवायला हवा. या हस्तकांनी संपूर्ण देशात उमेदवार उभे करायला हवेत, म्हणजे त्यांना जास्त पैसे मिळतील. महाराष्ट्रात त्यांना कमी पैसे मिळतात. देशात त्यांना जास्त पैसे मिळतील असा टोलाही त्यांनी राज ठाकरेंना लगावला.

संजय राऊत म्हणाले की, प्रकाश आंबडेकर हे आमच्यासोबत येण्याचा प्रयत्न करत होते. ते महाविकासआघाडीचे घटक होते. लोकसभेत आम्ही त्यांना 7 जागा देणार होतो. अकोल्यासह सात जागांचा यात समावेश होता. तरीही ते त्यांच्या बाजूला वळले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आणि भूमिकेचा विचार अजिबात करत नाहीत. प्रकाश आंबेडकर हे आंबडेकर आहेत. आम्ही आजही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानतो. या देशावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार आहेत. प्रकाश आंबेडकरांना जर याचे भान असते तर त्यांनी अशाप्रकारचे वक्तव्य केले नसते. रामदास आठवले, जोगेंद्र कराडे, राजेंद्र गवई हे सर्व आंबेडकरांच्या खरे वारसदार विचारधारेचे शिलेदार आहेत, असं आम्ही म्हणालो तर त्यात काहीही चुकीचं नाही असे संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img